उस्मानाबाद तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींवर राहणार खुल्या प्रवर्गातील सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:15 AM2021-01-24T04:15:14+5:302021-01-24T04:15:14+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील १११ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी येथील महसूल भवन येथे पार पडला. ९ ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती ...
उस्मानाबाद : तालुक्यातील १११ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी येथील महसूल भवन येथे पार पडला. ९ ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता तर १० ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी आरक्षण सुटले आहे. २ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती २ ग्रामपंचायतीत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी असणार आहे. ना.मा.प्र. स्त्री प्रवर्गाकरिता १५ ग्रामपंचायती, ना.मा.प्र. प्रवर्गाकरिता १५ ग्रामपंचायती, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता २९ ग्रामपंचायती, सर्वसाधारण ग्रामपंचायतीसाठी २९ राहणार आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्ग :- कारी, ताेरंबा, आंबेडोळ, टाकळी बेंबळी, कनगरा, भिकार सारोळा, नितळी, वडगाव, बोरखेडा. अनुसूचित जाती महिला प्रवर्ग :- समुद्रवाणी, उमरेगव्हान, पोहनेर, बेगडा, रुई ढोकी, देवळाली, कामेगाव, गडदेवधरी, कोलेगाव.
अनुसूचित जमाती प्रवर्ग : पळसप, सांजा अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला : तेर, कोळेवाडी ना.मा.प्र. प्रवर्ग :- इर्ला, राजुरी, बाबी. का, वाडीबामणी, ताकवीकी, दाउतपूर, जागजी, आंबेवाडी, चिखली, जवळे दुमाला, पळसवाडी, मेंढा, मेडसिंगा, बुकनवाडी.
ना.मा.प्र. महिला प्रवर्ग :- सारोळा. बु., आंबेजवळगा, ढोकी, मोहतरवाडी, सुंभा, मुळेवाडी, गावसूद, दूधगाव, उत्तमी कायापूर, भानसगाव, सोनेगाव, धुत्ता, तुगाव, बरमगाव बु., सकनेवाडी.
सर्वसाधारण प्रवर्ग :- केशेगाव, पिंपरी, गोपाळवाडी, आळणी, घाटग्री, चिलवडी, कोंड, उपळा, काजळा, आरणी, घुग्गी, हिंगळजवाडी, कुमाळवाडी, वाखरवाडी, कौडगाव बावी, सुर्डी, बामणी, कावळेवाडी, जहागीरदारवाडी, गोरेवाडी, धारुर, करजखेडा, भंडारवाडी, कौडगाव, खेड, दारफळ, कोंबडवाडी, पवारवाडी, खामगाव, तसेच सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी रामवाडी, शेकापूर, शिंगोली, वरवंटी, खामसवाडी, गोवर्धनवाडी, येडशी, तावरजखेडा, किनी, पाटोदा, पाडोळी आ. नांदुर्गा, सांगवी, अनसुर्डा, वाणेवाडी, जुनोनी, बोरगाव राजे, महाळगी, विठ्ठलवाडी, रुईभर, लासोना, वरुडा, येवती, भंडारी, तडवळा क, वाघोली डकवाडी, टाकळी (ढोकी) या ग्रामपंचायती राहणार आहेत.