पाेषण आहाराच्या दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजारांचे बँक खाते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:23 AM2021-07-02T04:23:01+5:302021-07-02T04:23:01+5:30

काेराेनाच्या संकटामुळे उन्हाळी सुटीतही पाेषण आहार देण्याचे शासनाचे निर्देश हाेते. मात्र, आता हा आहार शिधा स्वरूपात न देता थेट ...

Thousands of bank accounts will have to be taken out for Rs. | पाेषण आहाराच्या दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजारांचे बँक खाते..!

पाेषण आहाराच्या दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजारांचे बँक खाते..!

googlenewsNext

काेराेनाच्या संकटामुळे उन्हाळी सुटीतही पाेषण आहार देण्याचे शासनाचे निर्देश हाेते. मात्र, आता हा आहार शिधा स्वरूपात न देता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यास १५६ रुपये, तर सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यास २३४ रुपये देण्यात येणार आहेत. एवढ्या तुटपुंजा रकमेसाठी संबंधित विद्यार्थ्याचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे लागणार आहे. ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांचे जाळे फारसे विस्तारलेले नाही. त्यामुळे अनेक गावांतील विद्यार्थ्यांसह पालकांना दहा ते पंधरा कि.मी. पायपीट करून बँकेत खाते उघडावे लागणार आहे. ही गैरसाेय लक्षात घेऊन, अनेक पालक सध्या सदरील निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.

बँकेत खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये...

२०२१ मधील उन्हाळी सुटीच्या कालावधीतील शालेय पाेषण आहार याेजनेंतर्गतचा लाभ डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

यासाठी विद्यार्थ्यांना नजीकच्या राष्ट्रीयीकृत बँकेत आपले खाते उघडावे लागणार आहे. यासाठी त्यांना किमान हजार रुपये लागणार आहेत. म्हणजेच दीडशे रुपयांसाठी हजारांचा खर्च करावा लागणार आहे.

ग्रामीण भागात राष्ट्रीयीकृत बँकांचे फारसे जाळे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना याही गैरसाेयीचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Thousands of bank accounts will have to be taken out for Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.