१० हजारांची लाच घेणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधकासह तिघे ॲँटी करप्शनच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:32 AM2021-04-17T04:32:58+5:302021-04-17T04:32:58+5:30
तक्रारदार हे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात खरेदी-विक्रीचे दस्त तयार करण्याचे काम करत असून तक्रारदार यांनी मोहा येथील पक्षकाराचे ...
तक्रारदार हे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात खरेदी-विक्रीचे दस्त तयार करण्याचे काम करत असून तक्रारदार यांनी मोहा येथील पक्षकाराचे जमीन खरेदी खत दस्त बनवून कळंळ येथील प्रभारी दुय्यम निबंधक यांचेकडे सादर होते. यावेळी त्यांनी पक्षकार लिहून देणार हे वयोवृद्ध असून सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याचे कारण सांगून सदर कामासाठी पक्षकाराकडून १० हजार घेऊन देण्यासाठी पंचांसमक्ष सांगून दहा हजार रुपये लाचेची मागणी ८ एप्रिलला केली. त्यानंतर १६ एप्रिलला लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारून त्यांचा खासगी ड्रायव्हर विठ्ठल गहुदळे यांच्याकडे दिली. या कामात गणेश फावडे यांनी प्रोत्साहन दिले होते. ही कारवाई उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, अंमलदार इफ्तेकार शेख, विष्णू बेळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे यांनी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू होती.