प्रज्ञाशाेध परीक्षेत तिघे चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:44 AM2021-06-16T04:44:06+5:302021-06-16T04:44:06+5:30
इटकूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या रोहण लक्ष्मण शिंदे (९१ टक्के), श्रद्धा महादेव कोठावळे (८२ टक्के), ओमकार कमलाकर जगताप (६९ ...
इटकूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या रोहण लक्ष्मण शिंदे (९१ टक्के), श्रद्धा महादेव कोठावळे (८२ टक्के), ओमकार कमलाकर जगताप (६९ टक्के) गुण घेऊन राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. याबद्दल प्रशाला आणि गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप म्हणून भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुका सरचिटणीस प्रदीप फरताडे यांनी प्रत्येकी १ हजार १ रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरव केला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सुबोध मोकाशे यांच्यासह मार्गदर्शक शिक्षकांचेही स्वागत करण्यात आले.
यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई बाबूराव जाधव, भाजपा तालुका सरचिटणीस प्रदीप फरताडे, ग्रां.प. सदस्य हनुमंत कसपटे, विनोद चव्हाण, पत्रकार लक्ष्मण शिंदे, शिवाजी आडसूळ, दत्तात्र्यय बावळे, सुधाकर रणदिवे, अभिजित गंभीरे आदींची उपस्थिती हाेती.