थरारक! तपास पथकातील पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकली, PSI ला बंदी बनवत केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:50 PM2022-04-05T15:50:55+5:302022-04-05T15:52:35+5:30

पोलीस कुमक घटनास्थळी पोहताच पाटील कुटूंबीयानी पथकातील पोलीसांच्या डोळ्यात चटणी फेकत तुफान दगडफेक केली.

Thrilling! Chutney was thrown in the eyes of the police in the investigation team, PSI was banned and beaten | थरारक! तपास पथकातील पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकली, PSI ला बंदी बनवत केली मारहाण

थरारक! तपास पथकातील पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकली, PSI ला बंदी बनवत केली मारहाण

googlenewsNext

परंडा ( उस्मानाबाद ) : एका गुन्हाच्या तपासासाठी गेलेल्या पोलिस पथकाच्या डोळ्यात चटणी फेकून कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे यांना बंदी बनवून मारहाण केली, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला परंडा शहरापासून ४ किमी अंतरावरील कुर्डवाडीरोड लगतच्या पाटील वस्तीवर झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, औंदुंबर प्रकाश पाटील यांच्या शेतीच्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याकरिता पोलीस पथक पाटील वस्तीवरील उमाकांत पाटील यांच्याकडे चौकशीसाठी गेले होते. दरम्यान, तपास प्रमुख राजकुमार ससाणे व उमाकांत पाटील यांच्यात खडाजंगी झाली. 

त्यानंतर उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील,  रामराजे उमाकांत पाटील, पल्लवी उमाकांत पाटील,  मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील यांनी अचानकपणे कोयता, काठीने तपास पथकावर हल्ला चढवला. पथकातील महिला पोलीस शबाना मुल्ला यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहीती दिली. त्यानंतर पोलीसांचा ताफा पाटील वस्तीच्या दिशेने रवाना झाला. पोलीस कुमक घटनास्थळी पोहताच पाटील कुटूंबीयानी पथकातील पोलीसांच्या डोळ्यात चटणी फेकत तुफान दगडफेक केली. तर पोलीस उपनिरिक्षक राजकुमार ससाणे यांना घरात बंदी बनवून त्यांना मारहाण केली. 

दोन तासांच्या थरारानंतर पाटील कुंटूबीच्या तावडीतून पोलीस निरिक्षक ससाणे यांना सोडवण्यात पोलीस यशस्वी ठरले. घटनास्थळावरून पोलीसांनी पल्लवी उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील यांना ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेऊन उमाकांत पाटील, रामराजे उमाकांत पाटील, मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील  फरार झाले. गंभीर जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे यांच्यावर येथिल उपाजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: Thrilling! Chutney was thrown in the eyes of the police in the investigation team, PSI was banned and beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.