स्त्री जातीच्या अर्भकास काटेरी झुडपांत दिले फेकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:32 AM2021-04-24T04:32:45+5:302021-04-24T04:32:45+5:30

उमरगा : शहरातील ओंकारनगर परिसरात अज्ञात महिलेने स्वत:च्या स्री जातीच्या अर्भकाला फेकून देऊन पलायन केले हाेते. ही घटना शुक्रवारी ...

Throwing female infants into thorny bushes | स्त्री जातीच्या अर्भकास काटेरी झुडपांत दिले फेकून

स्त्री जातीच्या अर्भकास काटेरी झुडपांत दिले फेकून

googlenewsNext

उमरगा : शहरातील ओंकारनगर परिसरात अज्ञात महिलेने स्वत:च्या स्री जातीच्या अर्भकाला फेकून देऊन पलायन केले हाेते. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, अर्भक जिवंत असून, उपजिल्हा रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथे दाखल केले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील ओंकारनगर येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास माॅर्निंग वाॅकसाठी निघालेल्या नागरिकांना येथील मोकळ्या जागेवरील काटेरी झुडपांत स्री जातीच्या अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. यानंतर नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. तर शेजारील इमारतीत वास्तव्यास असलेले तलमोड टोल नाक्याचे साहाय्यक व्यवस्थापक अजिंक्यराजे महाडिक व अपूर्वाराजे महाडिक या दाम्पत्याने अर्भकाला उचलून आणले. यानंतर त्यास दूध पाजले. दरम्यान, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवत अर्भकास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. एकीकडे माणुसकी व मातृत्वाला काळिमा फासणारी घटना घडली असताना दुसरीकडे मात्र अपूर्वाराजे यांनी मातृत्वाचे व माणुसकीचे दर्शन घडविले.

अर्भकावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी उस्मानाबादला हलविण्यात आले.

Web Title: Throwing female infants into thorny bushes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.