कोरोना उपाययोजनांबाबत सहाशे कुटुंबांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:35 AM2021-05-20T04:35:00+5:302021-05-20T04:35:00+5:30

उमरगा : कोरोना संसर्ग प्रतिबंध आणि त्यावरील उपाय यासंदर्भात स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या ...

Training six hundred families on corona measures | कोरोना उपाययोजनांबाबत सहाशे कुटुंबांना प्रशिक्षण

कोरोना उपाययोजनांबाबत सहाशे कुटुंबांना प्रशिक्षण

googlenewsNext

उमरगा : कोरोना संसर्ग प्रतिबंध आणि त्यावरील उपाय यासंदर्भात स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील ४० गावांतील ६०० कुटुंबांना मंगळवारी ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षणात कोविड प्रतिबंधक उपाय यासोबतच शाश्वत शेती आणि शेतीपूरक उत्पादने याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात गावस्तरावरील लीडर महिलांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा व काजळा गावातील लीडर महिलांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कामाचे अनुभव कथन केले. या दोन्ही गावांत सध्या एकही रुग्ण नाही. नागरिक मास्क वापरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेत आहेत. स्वयंम शिक्षण प्रयोगाकडून या प्रशिक्षणात बीजप्रक्रिया, उगवण क्षमता, सेंद्रिय खताचा वापर याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. प्रोजेक्ट मॅनेजर तब्बसूम मोमीन, जिल्हा व्यवस्थापक बाळासाहेब काळदाते तसेच माधव बोरकट्टे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तालुका समन्वयक शीतल रणखांब, शिल्पा वेलदोडे, सुजाता पाटील, रोहिणी घोडके, अंजना साबळे, जोत्स्ना माने यांनी यासाठी सहकार्य केले.

Web Title: Training six hundred families on corona measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.