अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या वतीने वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:59+5:302021-07-14T04:37:59+5:30
नळदुर्ग : येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने येथील श्री क्षेत्र मैलारपुरात ५१ वृक्षांची लागवड करण्यात ...
नळदुर्ग : येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने येथील श्री क्षेत्र मैलारपुरात ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. मागच्या चार वर्षांपासून येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरात वृक्ष लागवड करून त्या वृक्षांचे संगोपन भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके हे करीत आहेत. गेल्या चार वर्षात समितीने जवळपास ६१ वृक्षांचे जतन केले आहे.
श्री क्षेत्र मैलारपुरात येथे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोउपनि कैलास लहाने व नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय दासकर, सुधीर हजारी, भाजपाच्या उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुशांत भूमकर, भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे तालुका सरचिटणीस सुजित सुरवसे, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख, सुधीर पोतदार, खंडोबाचे पुजारी, अशोक चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, मारुती खारवे, रघुनाथ नागणे, पप्पू पाटील, सुजीत बिराजदार, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, नाभिक समाजाचे राजेंद्र महाबोले, जमनसिंह ठाकूर, शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे, न. प. चे कर्मचारी मुनीर शेख, खलील शेख, पप्पू खारवे, ज्योती बचाटे आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी उत्सव समितीचे पद्माकर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, विलास येडगे, अमर भाळे, मारुती घोडके, महेश घोडके, अशोक घोडके, अमित शेंडगे यांच्यासह समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
130721\1658-img-20210713-wa0002.jpg
वृक्षारोपण करताना येथील सपोनि सुधीर मोटे