संकट दूर होण्यासाठी तुळजाभवानीला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:53 AM2021-05-05T04:53:11+5:302021-05-05T04:53:11+5:30
सोमवारी सकाळी अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर विविध दैनंदिन धार्मिक विधी पार पडले. यानंतर महंत व भोपे पुजारी यांनी श्री ...
सोमवारी सकाळी अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर विविध दैनंदिन धार्मिक विधी पार पडले. यानंतर महंत व भोपे पुजारी यांनी श्री तुळजाभवानीची दररोजची अलंकार महापूजा मांडताना श्री तुळजाभवानीच्या मस्तकावर चंदनी मळवटात डॉक्टरांचे बोधचिन्ह हळदी-कुंकुवाने टिळारूपी साकारले. या पूजेतून श्री तुळजाभवानीने नागरिकांचे कोरोनापासून रक्षण करावे व हे संकट दूर करावे, अशी तुळजाभवानीकडे प्रार्थना करण्यात आली.
म्हणून ते बोधचिन्ह...
गेले वर्षभर डॉक्टर कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत. या डॉक्टरांना तुळजाभवानी शक्ती देवो व त्यांच्या हातून लवकरात लवकर राज्य-देश कोरोनामुक्त होवो, या उद्देशाने व डॉक्टरांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी अलंकार पूजेत देवीच्या मस्तकातील चंदनी टिळ्यात कुंकू-हळदीचे वैद्यकीय सेवेचे बोधचिन्ह साकारले होते.
-अभय अरुण पाटील, भोपेपाळी पुजारी