ऑनलाईन परीक्षेत तुपारे यांनी पटकाविले लाखाचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:13 AM2021-02-05T08:13:41+5:302021-02-05T08:13:41+5:30
भूम : समृद्धी प्रज्ञाशोध संस्था (नाशिक) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत रजनीकांत शहाजी तुपारे यांनी प्रथम क्रमांक मिळवित ...
भूम : समृद्धी प्रज्ञाशोध संस्था (नाशिक) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत रजनीकांत शहाजी तुपारे यांनी प्रथम क्रमांक मिळवित १ लाखाचे बक्षीस मिळविले.
समृद्धी प्रज्ञाशोध संस्थेकडून एक पुस्तक परीक्षेपूर्वी दिले जाते. या पुस्तकामध्ये १ हजार प्रश्न असतात. एक हजार प्रश्नामधील केवळ १०० प्रश्न परीक्षेवेळी विचारले जातात. ही परीक्षा ऑनलाईन घेतली जाते. कमी वेळात या परीक्षेचे प्रश्न सोडवायचे होते. तुपारे यांनी केवळ २ मिनिटे ४५ सेकंदात एकही प्रश्न न चुकता या प्रश्नांची अचूक उत्तरे सोडवून महाराष्ट्रातील १५ हजार विद्यार्थ्यांतून प्रथम क्रमांक मिळविला. रजनीकांत शहाजी तुपारे हे मुळचे बोरगाव (ध.), ता. कळंब येथील रहिवासी असून, सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडेश्वरवाडी (ता. परंडा) येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिष्यवृत्तीचे वितरण ३१ जानेवारी रोजी नाशिक येथे होणार आहे.
काेट...
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन परीक्षा लाभदायी ठरणारी आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. या माध्यमातून मला मिळालेली १ लाखाची रक्कम मी गरीब, होतकरू विद्यार्थी यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी खर्च करणार असल्याचे मत तुपारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.