तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:09 PM2018-06-29T13:09:36+5:302018-06-29T13:09:36+5:30
मराठ्यांना आरक्षण, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अन शेतकऱ्यांना संरक्षण या तीन प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू केले आहे.
तुळजापूर (उस्मानाबाद) : मराठ्यांना आरक्षण, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अन शेतकऱ्यांना संरक्षण या तीन प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू केले आहे. या अंतर्गत आज राज्यभरातून दाखल झालेल्या मराठा बांधवांनी तुळजापुरात मोर्चा काढला.
सकाळी 11.30 वाजता येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तेथून तुळजाभवानी मातेच्या महाद्वारावर हा मोर्चा धडकला. 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोषाने तुळजापूर नगरी निनादली आहे. महाद्वारावर सध्या जागरण-गोंधळ घालण्यात येत आहे. यानंतर काही वक्त्यांची भाषणे होणार असून, त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे.