वॉचमनच्या खुनातील आणखी दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:55+5:302021-06-11T04:22:55+5:30

कळंब येथील मार्केट यार्ड भागात अजय जाधव यांच्या आडतीवर मच्छिंद्र छगन माने (रा. फरिदनगर डिकसळ भाग) हे हमाली व ...

Two more arrested in Watchman's murder | वॉचमनच्या खुनातील आणखी दोघे जेरबंद

वॉचमनच्या खुनातील आणखी दोघे जेरबंद

googlenewsNext

कळंब येथील मार्केट यार्ड भागात अजय जाधव यांच्या आडतीवर मच्छिंद्र छगन माने (रा. फरिदनगर डिकसळ भाग) हे हमाली व वॉचमन म्हणून काम करत होते. गत शुक्रवारी कर्तव्यावर असताना माने यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी मयताचा मुलगा विशाल माने यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी दोघांना अटक केली होती. याशिवाय याप्रकरणात त्यांच्यासह अन्य नऊ व्यक्तींचा सहभाग असल्याचे समोर आले होते. यानंतर कळंब पोलिसांच्या पथकाने दत्ता बब्रुवान पवार याच्यासह आणखी एकास अटक केली आहे. यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या चार झाली आहे. सद्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

Web Title: Two more arrested in Watchman's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.