मंगरुळ येथून दुचाकी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:49 AM2021-02-23T04:49:54+5:302021-02-23T04:49:54+5:30

३३७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३३७ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाया केल्या. या कारवाया २१ फेब्रुवारी ...

Two-wheeler stolen from Mangrul | मंगरुळ येथून दुचाकी चोरीस

मंगरुळ येथून दुचाकी चोरीस

googlenewsNext

३३७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३३७ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाया केल्या. या कारवाया २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध मार्गावर १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने केल्या. वाहनचालकांकडून ६८ हजार ९०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

वाहनचालकास अडीच हजार रुपयांचा ठोठावला दंड

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील सर्फराज शेख यांनी निष्काळजीपणे वाहन चालवून एका व्यक्तीस धड देऊन जखमी केले होते. या प्रकरणी त्यांना भा.दं.सं. कलम-२७९, ३३७ सह मो.वा. का. कलम -१८४ चे उल्लंघनाबद्दल उस्मानाबाद प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २२ फेब्रुवारी रोजी दोषी ठरवून २ हजार ५०० रुपयांचा दंडाची व दंड न भरल्यास ५ दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सावरगावातून ट्रॅक्टर पळविला

उस्मानाबाद : सोलापूर जिल्ह्यातील केगाव येथील अतुल गायकवाड यांनी त्यांचा एमएच. १३ डीएम ६८८४ क्रमांकाचा ट्रॅक्टर सावरगाव येथील आपल्या शेतात १६ फेब्रुवारी रोजी उभा केला होता. तो दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आढळून आला नाही. याप्रकरणी अतुल गायकवाड यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद झाला.

ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

उस्मानाबाद : औसा तालुक्यातील टाका येथील आण्णासाहेब शिंदे व गणेश शिंदे हे दोघे १९ फेब्रुवारी रोजी सारोळा येथील बसथांब्याजवळील रस्त्याच्या कडेला दुचाकीसह थांबले होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवून दोघांना धडक दिली. यात अण्णासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला तर गणेश शिंदे हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक मालकाने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पोलीस ठाण्यात अपघाताील ट्रॅक्टरऐवजी दुसराच ट्रॅक्टर आणून उभा केला. याप्रकरणी मयताचे भाऊ अजित शिंदे यांच्याफिर्यादीवरुन संबंधिताविरुध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Two-wheeler stolen from Mangrul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.