भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार
By राजकुमार जोंधळे | Updated: January 9, 2024 19:47 IST2024-01-09T19:47:31+5:302024-01-09T19:47:46+5:30
उमरगा ते लातूर महामार्गारील घटना...

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार
धाराशिव : भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना उमरगा ते लातूर महामार्गार घडली. याबाबत उमरगा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, विजयानंद बालाजी घंटे (वय २४) हा सौरभ महादेव पाचंगे (वय १९, दोघेही रा. नारंगवाडी, ता. उमरगा) दुचाकीवरुन (एम.एच. २५ बी.बी. ०९१५) कवठा येथून नारंगवाडीकडे जात हाेते. दरम्यान, उमरगा-लातूर महामार्गावरील मातोळा बोरी पुलानजीक कारने (एम.एच. २४ व्ही. ६८९७) विजयानंद घंटे याच्या दुचाकीला समोरुन जाेराची धडक दिली. यात विजयानंद घंटे हा गंभीर जखमी झाला तर, सौरभ पाचंगे हा जागीच ठार झाला आहे. घटनास्थळी चालाकाने कार जाग्यावरच सोडून पसार झाला आहे. याबाबत उमरगा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.