पत्नीसोबतचे अनैतिक संबंध उघड; बॉयफ्रेंडने पतीला संपवलं, म्हणाला मी नसते मारले तर... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:43 PM2023-07-03T19:43:37+5:302023-07-03T19:49:58+5:30

पत्नीशी आरोपीचे संबंध असल्याचे मृत तरुणास होते माहीत

Unethical relationship with wife exposed; Boyfriend kills husband, says if I hadn't killed him... | पत्नीसोबतचे अनैतिक संबंध उघड; बॉयफ्रेंडने पतीला संपवलं, म्हणाला मी नसते मारले तर... 

पत्नीसोबतचे अनैतिक संबंध उघड; बॉयफ्रेंडने पतीला संपवलं, म्हणाला मी नसते मारले तर... 

googlenewsNext

वाशी (जि. उस्मानाबाद) : कळंब तालुक्यातील ईटकूर येथील राहुल रणजित फरताडे (२७) या तरुणाचा अनैतिक संबंधातून मांडवा शिवारात खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस वाशी पोलिसांनी गजाआड केले असून, त्याने खुनाची कबुलीही दिली आहे.

राहुल हा ३० जूनच्या रात्री पार्टीसाठी म्हणून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. दरम्यान, ११ वाजण्याच्या सुमारास राहुल याचा मृतदेह मांडवा शिवारात पडला असल्याचा फोन त्याच्या वडिलांना आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाठोपाठ वाशी पोलिसही तेथे पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह वाशीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. या घटनेप्रकरणी राहुलचे वडील रणजित फरताडे यांच्या तक्रारीवरून अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाशी ठाण्याचे सहायक निरीक्षक राजकुमार ससाणे यांनी लागलीच तपास सुरू केला तेव्हा हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले. संशयावरून मृत राहुल याची पत्नी व ईटकूर येथीलच सुरेश दादाराव फरताडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सुरेश फरताडे याने खून केल्याची कबुली दिली.

....म्हणे राहुलच करणार होता खून
आरोपी सुरेश फरताडे याने चौकशीत राहुल हाच आपला खून करणार होता, अशी माहिती पोलिसांना दिली. त्याच्या पत्नीशी आपले अनैतिक संबंध असल्याचे राहुलला माहीत झाले होते. यामुळे त्याच्याआधी आपणच काटा काढण्याचे ठरविले. शुक्रवारी त्यावर लक्ष ठेवत मांडवा शिवारात एकटे गाठून खून केल्याचीही माहिती आरोपीने दिल्याचे वाशी पोलिसांनी सांगितले.

नातेवाइकांचा आक्रमक पवित्रा
राहुल फरताडे याचा खून झाल्याचे समजल्यानंतर नातेवाइकांनी आरोपीला ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा शनिवारी घेतला होता. दुपारी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे सांगितल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

Web Title: Unethical relationship with wife exposed; Boyfriend kills husband, says if I hadn't killed him...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.