आठवडी बाजारात कॅरीबॅगचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:27 AM2020-12-23T04:27:43+5:302020-12-23T04:27:43+5:30
महाविद्यालयात रक्तदान शिबीर उस्मानाबाद : येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सह्याद्री ब्लड बँक यांच्या वतीने ...
महाविद्यालयात रक्तदान शिबीर
उस्मानाबाद : येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सह्याद्री ब्लड बँक यांच्या वतीने रक्तदान शबीर घेण्यात आले. यावेळी रासेयो विभागातील ४८ विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग नोंदविला. यावेळी प्राचार्य डाॅ. जयसिंगराव देशमुख, प्रकल्पाधिकारी प्रा. माधव उगीले, प्रा. बालाजी नगरे, प्रा. मोहन राठोड, प्रा. डाॅ. विद्या देशमुख, प्रा. श्रीराम नागरगोजे, प्रा. राजा जगताप, सह्याद्री ब्लड बँकेचे अल्केश पोहरेगावकर, प्रताप चौरे, आकाश दापके, महेश तोडकरी, अशोक गायकवाड, भीम मलकुनाईक, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.
दोन टप्प्यात वीज देण्याची मागणी
येणेगूर : येथील वीज उपकेंद्रातून कृषी पंपाना तीन टप्प्यात वीज पुरवठा दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना सायंकाळी चार ते रात्री बारा व दुसऱ्या आठवड्यात रात्री बारा ते सकाळी आठ या वेळेत पाणी देणे जिकिरीचे होत आहे. वास्तविक दोन टप्प्यात वीज पुरवठ्याचे आदेश अहतानाही येथील उपकेंद्रातून मात्र हे आदेश डावलले जात असल्याचा आरोप करीत दोन टप्प्यात वीज पुरवठ्याचे आदेश देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.