कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय, काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:35 AM2021-08-27T04:35:19+5:302021-08-27T04:35:19+5:30
उस्मानाबाद : तरुणांपासून वृद्धापर्यंत अनेक जण चष्म्याशिवाय आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. मात्र, लेन्सची योग्य ती काळजी न ...
उस्मानाबाद : तरुणांपासून वृद्धापर्यंत अनेक जण चष्म्याशिवाय आता कॉन्टॅक्ट लेन्स वापरू लागले आहेत. मात्र, लेन्सची योग्य ती काळजी न घेतल्यास जंतुसंसर्ग होऊन किंवा बुबुळाला इजा होऊ शकते. त्यामुळे डोळ्याच्या सुरक्षेसाठी लेन्सच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
अनेकांना चष्मा वापरण्याचा त्रास असतो. तर काहींना डोळ्यावर नेहमी नंबरचा चष्मा नको वाटत असतो. अशा व्यक्तींना कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यावर भर देत आहेत. लेन्समुळे नंबर नसलेल्या अन्य व्यक्तीप्रमाणे पाहता येते. त्यामुळे आता तरुणांपासून वयोवृद्ध व्यक्तीही लेन्स वापराकडे वळत आहेत. मात्र, कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना योग्य ती काळजी न घेतल्यास त्यांची डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे लेन्सचा वापर योग्य पद्धतीने करावा असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
ही घ्या काळजी....
१. चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरता काळजी घेणे महत्त्वाचे असते. डोळ्यात लेन्स बसवताना हात स्वच्छ धुवणे तसेच लेन्स काढतावेळी हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे.
२. दुपारी झाेपता वेळी २ तासापेक्षा अधिक तास डोळ्यात लेन्स ठेवून झोपू नये, रात्री झोपतावेळी तसेच पोहताना लेन्सचा वापर करणे टाळावा. तसेच डोळ्याची अधून-मधून तपासणी करावी.
चष्म्याला करा बाय-बाय...
चष्म्याऐवजी लेन्सचा वापर करण्यासाठी नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. डोळ्याच्या नंबर नुसार उजव्या व डाव्या डोळ्यांची नेल्स तयार करून घेऊन वापर योग्य पद्धतीने करणे. तसेच डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्यास चष्मा वापरण्याची गरज भासत नाही.
नेत्रतज्ज्ञ म्हणतात...
नंबर चेक करून कॉन्टॅक्ट लेन्स तयार करून घेतल्यानंतर लेन्स वापरण्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. लेन्स वापर हात स्वच्छ न धुता केल्यास जंतुसंसर्ग तसेच डोळ्याला अल्सर होऊ शकतो. जास्त संसर्ग झाल्यास डोळ्याची दृष्टीही जाऊ शकते.
डॉ. महेश पाटील, नेत्रतज्ज्ञ
कॉन्टॅक्ट लेन्स डोळ्याच्या बुबळावर बसत असल्यामुळे सर्वसामान्य नंबर नसलेल्या व्यक्ती प्रमाणे पाहता येते. लेन्स वापरताना डोळ्यांची तपासणी करून घेणे आवश्यक असते. लेन्स डोळ्यात लावण्यापूर्वी व काढतावेळी सोल्युशनने स्वच्छ करावी.
डॉ. ज्योती कानडे, नेत्रतज्ज्ञ