नायगावात २०० जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:58+5:302021-05-20T04:34:58+5:30
खुदावाडीत १० खाटांचे विलगीकरण कक्ष अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे बसवेश्वर जयंतीनिमित्त जमविलेला निधी तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागातून १० ...
खुदावाडीत १० खाटांचे विलगीकरण कक्ष
अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे बसवेश्वर जयंतीनिमित्त जमविलेला निधी तसेच ग्रामस्थांच्या लोकसहभागातून १० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे. विलगीकरण कक्षासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला होता. यास प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर हे कक्ष सुरू करण्यात आले. यासाठी शिवप्पा जवळगे, उमाशंकर चिंचोले, राम जवळगे, दीपक कापसे, भास्कर व्हलसुरे, पांडुरंग व्हलसुरे आदींनी ग्रामसेवक महेश मोकाशे यांच्याकडे निधी सुपुर्द केला.
जेवळीत लसीकरणासाठी ग्रामस्थांची गर्दी
लोहारा - तालुक्यातील जेवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी बुधवारी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मात्र, प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे या केंद्रावर शांततेत लसीकरण पार पडले. या ठिकाणी ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात मंडप टाकून योग्य अंतर ठेवून खुणा करण्यात आल्या होत्या. तसेच खुर्च्या मांडून ग्रामस्थांना बसण्याची सोय करण्यात आली होती.
कोरोना विलगीकरण कक्षास आर्थिक मदत
तेर - येथील मुस्लीम बांधवांच्या वतीने ईद सण साधेपणाने साजरा करून कोरोना विलगीकरण कक्षास १५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी, विठ्ठल लामतुरे, भास्कर माळी, कफिल हाश्मी, फजिल काझी, शहाबाज मुलानी, जुबेर मुलानी, जाकेर शेख, अजिम मुलानी, शकिल मुलानी, साहिल शेख यांच्यासह ग्रामस्थ, मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईदनिमित्त गरजुूना जीवनावश्यक किट
कळंब - येथील एहसास फाउंडेशनच्या वतीने रमजान ईदनिमित्त शहरासह तालुक्यातील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. हजरत डाॅ. शाह जाकिर हमीद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष अमन मोमीन, आरेफ शेख, तोफिक सय्यद, वाजेद तांबोळी, उबेद खान, अनिस कुरेशी, सदेक तांबोळी, अलीम शेख, शिखूर मनियार यांनी पुढाकार घेतला. यावेळी ६५ गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
२०० नागरिकांना कुंभारीत लसीकरण
तुळजापूर - तालुक्यातील कुंभारी येथे मंगळवारी २०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले. यावेळी स्वतंत्र नोंदणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती नागरिकांच्या आधार कार्डची तपासणी करून नोंदणी टोकन देत होत्या. यासाठी डाॅ. डी. पी. उपासे, सरपंच संगीता कोळी, उपसरपंच संतोष क्षीरसागर, पोलीस पाटील विठ्ठल वडणे, विस्ताराधिकारी लोमटे, तलाठी रबडे, ग्रामसेवक मार्तंडे, कार्यकारी अभियंता सुरवसे आदींनी पुढाकार घेतला होता.
मांडव्यात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
वाशी - तालुक्यातील मांडवा येथील उपकेंद्रात ग्रामस्थांची कोरोनाबाबतची तपासणी करण्यात आली. यावेळी ४८ ग्रामस्थांची तपासणी करून उपचार करण्यात आले. ग्रामस्थांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच डाॅ. याेगिता देशमुख यांनी केले आहे. ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, डाॅक्टर, आशा कार्यकर्ती, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता.
बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
उमरगा - तालुक्यातील डिग्गी येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मुख्य चाैकात जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. प.पू. काेरणेश्वर महास्वामी यांनी कोरोना नियमांचे पालन करून याचे अनावरण केले. यावेळी संतोष मलशेटे, सिद्राम कवठे, संतोष कवठे, नागनाथ तडकले, शिवा हेबळे, राहुल कवठे, महातेश कवठे, अमोल पाटील, सचिन गायकवाड, साेमेश स्वामी, राम बेल्ले, सचिन कवठे, सिद्राम पाटील यांच्यासह ग्रामस्थ, समाज बांधव उपस्थित होते.
कोरोनामुक्त रुग्णांचा तेरमध्ये सत्कार
तेर - येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक राज तिलक राैशन, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. हनुमंत वडगावे, तहसीलदार गणेश माळी, डाॅ. नागनंदा मगरे, डाॅ. सचिन कोठावळे, डाॅ. अभिजित जाधव, सरपंच नवनाथ नाईकवाडी, मंडळ अधिकारी अनिल तीर्थकर, तलाठी श्रीधर माळी, डाॅ. बाहेती, डाॅ. खराडे, डाॅ. ढेकणे, डाॅ. मुळे, डाॅ. लोमटे, डाॅ. काटे आदींची उपस्थिती होती.
लसीकरणासाठी ग्रामस्थांच्या रांगा
ईट - भूम तालुक्यातील ईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामस्थांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. याठिकाणी ३०० लसींचा पुरवठा करण्यात आला होता. टोकन पद्धतीने ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले. यासाठी डाॅ. दिनेश डमरे, डाॅ. सूरज मोटे, विस्ताराधिकारी व्ही. जी. वाघमोरे, ग्रामविकास अधिकारी मुकुंद देशमुख, तलठी नीलेश केदार, डी. ए. ढेरे यांच्यासह आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती आदींनी पुढाकार घेतला होता.