तुळजापूर ‘ग्रामीण’मध्ये चार दिवसांपासून लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:53 AM2021-05-05T04:53:46+5:302021-05-05T04:53:46+5:30
तुळजापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण भागात ...
तुळजापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामीण भागात १० मार्चपासून प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण सुरू करून, सात प्राथमिक आरोग्य केंद्रांत आतापर्यंत १४ हजार ६४८ जणांना लसीची पहिली आणि दुसरी मात्रा दिली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून ग्रामीण भागात लसीचा तुटवडा असल्याने, ग्रामीण भागात लसीकरण बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या अणदूर, नळदुर्ग, सावरगाव, काटगाव, मंगरूळ, सलगरा (दि.), जळकोट या सात प्राथमिक आरोग्य अंतगर्त १० मार्चपासून लसीकरणाची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांतर्गत १४५ सत्रांत आतापर्यंत लसीकरण झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना व दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलीस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ८०० जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे, तर १९६ जणांना दुसरी मात्रा दिली आहे.
तिसऱ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपुढील नागरिकांना तालुक्यातील अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २० सत्रामध्ये पहिली लस १ हजार ९२८ व्यक्तींना दिली, तर दुसरी लस १९९ देण्यात आली. सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१ सत्रामध्ये पहिली लस २ हजार ३२५ जणांना तर दुसरी लस २२३ जणांना असे लसीकरण केले आहे.
तसेच जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तगत २१ सत्रामध्ये पहिली लस १ हजार ७२२ जणांना, तर दुसरी लस २१२ जणांना दिली आहे. काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २१ सत्रामध्ये पहिली लस १ हजार २१६ जणांना, तर १५० दुसरी लस देण्यात आली आहे. मंगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२ सत्रांमध्ये १ हजार ६५६ जणांना पहिली लस तर ३८८ जणांना दुसरी लस देण्यात आली आहे.
नळदुर्ग केंद्रांतर्गत १९ सत्रामध्ये पहिली लस २ हजार ०१५ जणांनी तर दुसरी लस १२४ जणांनी दुसरी लस घेतली आहे. सलगरा (दि)केंद्रांतर्गत २१ सत्रामध्ये पहिली लस १ हजार ७६३ जणांना तर दुसरी लस २०२ जणांना आतापर्यंत दिली आहे.
चाैकट...
लसीकरणात ज्येष्ठ नागरिक पुढे
६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ८ जणांना ३०६ लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून, त्यामध्ये ७ हजार ५५४ जणांना आतापर्यंत पहिला डोस दिला आहे, तर ७५२ जणांना दोन्ही डोस आतापर्यंत दिले आहेत.
१८ वर्षांपुढील नागरिकांना ग्रामीण भागात लसीकरण सुरू नसल्याने, ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने ग्रामीण भागातही १८ वर्षांपुढील नागरीकांना लसीकरण सुरू करण्याची मागणी होत आहे.
काेट...
शासनाच्या गाइडलाइननुसार १८ वर्षांपुढील लाभार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात तुळजापूर येथे लसीकरण केंद्र उपलब्ध केले आहे. ग्रामीण भागात आणखी सुरू नाही. शासनाच्या गाइडलाइन येताच, ग्रामीण भागात लसीकरण सुरू करणार आहोत.
डाॅ.सुहास पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी.