महाराष्ट्रपुत्रास पठाणकोटमध्ये वीरमरण, सोनारी गावकऱ्यांवर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 07:21 PM2021-02-15T19:21:25+5:302021-02-15T19:23:48+5:30

शहीद जवान सागर तोडकरी यांचे प्राथमिक शिक्षण सोनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण परंडा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. रा. गे. शिंदे महाविद्यालयातून बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले.

Veeramran in Pathankot to Maharashtraputra, son of Osmanabad martyred | महाराष्ट्रपुत्रास पठाणकोटमध्ये वीरमरण, सोनारी गावकऱ्यांवर शोककळा

महाराष्ट्रपुत्रास पठाणकोटमध्ये वीरमरण, सोनारी गावकऱ्यांवर शोककळा

googlenewsNext
ठळक मुद्देरविवारी ते गस्तीवर असताना साधारपणे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वाहनास अपघात होऊन त्यांना वीरमरण प्राप्त झाले. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहीद जवान सागर तोडकरी यांचे पार्थिव पुणे येथे येईल

परंडा (जि. उस्मानाबाद) - पंजाबमधील पठाणकट येथे कर्तव्य बजावताना परंडा तालुक्यातील सोनारी येथील सागर पद्माकर तोडकरी (वय ३१) यांना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वीरमरण प्राप्त झाले. शहीद जवान तोडकरी यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी १० वाजता पुणे तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सोनारी येथे दाखल होणार आहे.

शहीद जवान सागर तोडकरी यांचे प्राथमिक शिक्षण सोनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण परंडा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. रा. गे. शिंदे महाविद्यालयातून बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. तर बार्शी येथून ‘बीसीए’चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तयारी केली असता, २०१० मध्ये ते सैन्य दलात दाखल झाले. नागपुरातील कामटी येथून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांना १५ कार्ड बटालीयनमध्ये पदस्थापना मिळाली. यानंतर प्रारंभी त्यांनी अहमदनगर, पंजाब, जम्मू काश्मीर येथे सेवा बजावल्यानंतर सध्या ते पंजाबमधील पठाणकोट येथे कार्यरत होते. 

दरम्यान, रविवारी ते गस्तीवर असताना साधारपणे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वाहनास अपघात होऊन त्यांना वीरमरण प्राप्त झाले. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहीद जवान सागर तोडकरी यांचे पार्थिव पुणे येथे येईल. यानंतर साधारणपणे दुपारी २ वाजेच्या सुमारास सोनारी येथे पार्थिव दाखल होईल. शहीद जवान तोडकरी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, गावचे सुपूत्र सागर ताेडकरी यांना वीरगती आल्याची वार्ता समजताच सोनारी, खासापुरीसह पंचक्रोशीतील गावांवर शोककळा पसरली.

Web Title: Veeramran in Pathankot to Maharashtraputra, son of Osmanabad martyred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.