विक्रेते-व्यावसायिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी वाटले मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:34 AM2021-04-02T04:34:24+5:302021-04-02T04:34:24+5:30

उस्मानाबाद : शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या साथीला रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. याच ...

Vendors-professionals felt masked by the Collector | विक्रेते-व्यावसायिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी वाटले मास्क

विक्रेते-व्यावसायिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी वाटले मास्क

googlenewsNext

उस्मानाबाद : शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या साथीला रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने जिल्हा व्यापारी महासंघाच्या मदतीने गुरूवारी शहरातील विविध भागातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, विविध व्यवसायिकांना-विक्रेत्यांना आणि मुख्य बस स्थानकातील प्रवाशांनाही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मास्कचे वाटप केले.

या उपक्रमाची सुरूवात शहरातील देशपांडे स्टॅन्डवरील भाजीपाला बाजारातून झाली. त्यांनतर बार्शी नाका, बार्शी रोड, औरंगाबाद रोडवरील फळ विक्रेते, गाडीवाले, ढेलेवाले, ज्यूस सेंटरवाले आणि इतर विक्रेते-व्यसायिक यांना या मास्कचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या सोबत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, तसेच जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव, उपाध्यक्ष संजय मोदानी, कोषाध्यक्ष धनजंय जेवळीकर आदी सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी जिल्हा व्यापारी संघाने सुमारे पाच ते सहा हजार कापडी मास्क उपलब्ध करून दिले होते.

चौकट.......

लॉकडाऊन टाळण्यासाठी उपाययोजनांना साथ द्या

जिल्हाधिकारी दिवेगावकर आणि इतर अधिकारी विक्रेते, व्यापाऱ्यांना मास्क घालून कोरोनाचा प्रसार होण्यापासून स्वत:ला वाचवण्याचे आवाहन करत होते. जिल्ह्यातील लॉकडाऊन टाळावयाचा असेल तर प्रशासनाच्या उपाययोजनांना जनतेने साथ द्यावी. स्वत:चे संरक्षण मास्कचा वापर करून, सामाजिक अंतर ठेवून आणि गर्दीत जाण्याचे टाळून करावे, असेही आवाहन केले.

Web Title: Vendors-professionals felt masked by the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.