पाेषण आहारावरून उपाध्यक्षांनी ‘शिक्षण’ला घेतले फैलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:32 AM2021-03-10T04:32:09+5:302021-03-10T04:32:09+5:30
‘सीईओं’ना यावे लागले बैठकीत -विभाग प्रमुखांना देता आली नाहीत उत्तरे?उस्मानाबाद -शालेय विद्यार्थ्यांचे चांगले पाेषण व्हावे, यासाठी शासनाकडून पाेषण आहार ...
‘सीईओं’ना यावे लागले बैठकीत -विभाग प्रमुखांना देता आली नाहीत उत्तरे?उस्मानाबाद -शालेय विद्यार्थ्यांचे चांगले पाेषण व्हावे, यासाठी शासनाकडून पाेषण आहार दिला जात आहे. परंतु, यातही मापात ‘पाप’ केले जात असल्याने भलत्याचेच ‘पाेषण’ हाेत असल्याची बाब ‘लाेकमत’ने उजेडात आणल्यानंतर उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत मुद्दा लावून धरला. अधिकाऱ्यांना अक्षरश फैलावर घेतले. परंतु, विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे खुद्द विभाग प्रमुखांना देता आली नाहीत. त्यामुळे ‘सीईओ’ डाॅ. फड यांना सभागृहात यावे लागले.
काेराेना काळातही जिल्हा परिषद शाळेतून धडे घेणाऱ्या गाेरगरीब चिमुकल्यांची पाेषण आहाराअभावी आबाळ हाेऊ नये, यासाठी काेरडा शिधा पालकांमार्फत देण्यात आला. काेराेच्या संकटकाळत ही याेजना विद्याार्थ्यांच्या हिताची ठरली. परंतु, संबंधित ठेकेदाराकडून शाळांना तांदूळ तसेच अन्य धान्य प्रत्यक्ष वजनापेक्षा कमी येत असल्याची ओरड हाेत हाेती. ही बाब ‘लाेकमत’ने मांडल्यानंतर ठेकेदाराने दिलेल्या एकेका पाेत्यात चार ते पाच किलाे तांदूळ कमी निघाला. सदरील वृत्त प्रसिद्ध हाेताच जिल्हा परिषद उपध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत यांनी तातडीने मंगळवारी शिक्षण समितीची बैठक बाेलावली. या बैठकीच्या अजेंड्यावर पाेषण आहारातील मापात ‘पाप’ हा प्रमुख विषय हाेता. बैठकीला सुरूवात हाेताच, ‘लाेकमत’च्या वृत्तााचा हवाला देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. एवढा तांदूळ कमी येताेच कसा? असा सवाल करीत यात काेण-काेण आहे? ‘शिक्षण’ची यंत्रणा करते काय? असे एक ना अनेक सवाल केले गेले. यानंतर भाजपाचे सदस्य अभय चालुक्य, सेनेचे उध्दव साळवी, काॅंग्रेसचे प्रकाश चव्हाण यांनी चाैकशीसाठी समिती नेमण्याची मागणी लावून धरली. उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे विभाग प्रमुखांकडून मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उपाध्यक्ष सावंत यांनी थेट ‘सीईओ’ डाॅ. फड यांना फाेन करून बैठकीस येण्याबाबत सांगिले. अवघ्या काही क्षणातच सीईओ डाॅ. फड सभागृहात दाखल झाले. त्यांच्याकडेही पाेषण आहार वाटपात ‘मापात पाप’ हाेत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘शिक्षण’ची कार्यपद्धती सुधारली पाहिजे, असेही ते म्हणाले. यानंतर सीईओ डाॅ. फड यांनी यापुढे मुख्याध्यापकांनी तांदूळ माेजून घेऊन तेवढीच पाेच देण्याबाबत आदेशित केले. यात हयगय करणार्यांविरूद्ध कठाेर कारवाई केली जाईल, असा दमही भरला. यानंतर सावंत यांनी पाेषण आहाराचा तांदूळ गाेडाऊनातून निघाल्यापासून शाळेत दाखल हाेईपर्यंत किती येताे? याची सखाेल तपासणी करण्याचे आदेशही शिक्षणाधिकारी डाॅ. माेहरे यांना दिले.
चाैकट...
शाळांना ठेकेदाराकडून कमी तांदूळ मिळत असल्याची ओरड हाेती. याबाबतच्या बातम्याही छापून आल्या आहेत. पाेषण आहारातच मापात पाप हाेत असेल तर काय उपयाेग? त्यामुळेच शिक्षण विषय समितीची तातडीने बैठक लावली. या बैठकीत सखाेल चर्चा झाली आहे. स्वत सीईओ डाॅ. फड बैठकीस उपस्थित राहिले. त्यांनीही याबाबतीत अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. तसचे वितरण प्रक्रियेची तपासणीही हाेईल. तसे आदेशही दिले आहेत.
-धनंजय सावंत, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.