Video: मराठा आंदोलक आक्रमक धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग राेखला
By बाबुराव चव्हाण | Published: October 30, 2023 12:54 PM2023-10-30T12:54:10+5:302023-10-30T13:06:07+5:30
महामार्गावरील वाहतूक बंद; संतप्त तरूणांनी टायर पेटविले
धाराशिव - अंतरवाली सराटी येथे मनाेज पाटील जरांगे यांचे उपाेषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. असे असतानाही सरकार ठाेस निर्णय घेत नसल्याचा आराेप करीत संतप्त झालेल्या मराठा समाजाने साेमवारी थेट धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग गाठत टायर पेटविले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग राेखला #MarathaReservationpic.twitter.com/sjBHV4M1hs
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 30, 2023
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांत गावाेगावी साखळी उपाेषण, गावबंदी, कॅंडल मार्च यासारखी आंदाेलने करण्यात आली. मात्र, आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे मराठा बांधवांचा आता संयम सुटला आहे. साेमवारी सकाळी धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाशी तालुक्यातील विझाेरा तसेच धाराशिव शहरानजिक असलेल्या शिंगाेली येथे टायर पेटवून संताप व्यक्त केला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.