आदेशाचे उल्लंघन; एकाविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:13+5:302021-05-29T04:25:13+5:30
शेत कुळविण्यावरून एकास मारहाण लोहारा : शेत कुळविण्याच्या कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना येथे २७ मे रोजी घडली. येथील ...
शेत कुळविण्यावरून एकास मारहाण
लोहारा : शेत कुळविण्याच्या कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना येथे २७ मे रोजी घडली.
येथील अलीम कलीम बांदार हे त्यांच्या शेतीची मशागत करीत होते. यावेळी गावातील फय्याज कुरेशी, अय्याज कुरेशी, मिनाज कुरेशी व रियाज कुरेशी या चाैघांनी ‘हे शेत आमचे असून, तु कुळवायचे नाही, तू येथून निघून जा नाही तर तुला ठार मारू’ अशी धमकी देत अलिम यांना शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी अलिम बांदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात वरील चाैघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदेशी, गावठी दारू केली जप्त
नळदुर्ग : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी दोन छापे टाकले. यात नटराज रामा राठोड (रामतीर्थ तांडा) यांच्याकडून विदेशी तर याच तांड्यावरील नंदकुमार शंकर पवार यांच्याकडून गावठी दारू जप्त करून गुन्हा दाखल केला.