नांदगाव येथे तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:23 AM2021-05-31T04:23:54+5:302021-05-31T04:23:54+5:30
वाशी -तालुक्यातील नांदगाव येथे सार्वजनिक विद्युतपंप चालू करण्याच्या कारणावरून संगनमत करून पाचजणांना बेदम मारहाण झाल्याची घटना २८ मे राेजी ...
वाशी -तालुक्यातील नांदगाव येथे सार्वजनिक विद्युतपंप चालू करण्याच्या कारणावरून संगनमत करून पाचजणांना बेदम मारहाण झाल्याची घटना २८ मे राेजी घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्याविरूद्ध वाशी पाेलीस ठाण्यात २९ मे राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नांदगाव येथील सुरेश चत्रभुज बांगर यांच्यासह मच्छिंद्र सारूक, उमाकांत चानप हे तिघे २८ मे राेजी ५ वाजेच्या सुमारास गावातीलच मारुती मंदिरासमाेर गेले हाेते. यावेळी तिथे थांबलेले गावकरी दादाराव जाधवर यांना सार्वजनिक विद्युतपंप चालू करण्याबाबत विचारणा करण्यासाठी गेले. यानंतर दादाराव जाधवर यांच्यासह जाधवर कुटुंबातील संतराम, महादेव, राजाभाऊ, विकास, अनिल, विशाल, अशाेक, बाळू, दत्ता घुले, पांडुरंग घुले, प्रकाश सारूक यांनी संगनमत करून बेकादेशीररीत्या जमाव जमवून तिघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बाचाबाचीचे पर्यावसान हाणामारीत झाले. मारहाणीत लाेखंडी गज, काठीचाही वापर करण्यात आला. यावेळी उपराेक्त तिघांच्या बचावासाठी आलेले गावकरी तुळशीराम सारूक, रमाकांत सानप यांनाही संबंधित बारा जणांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुरेश बांगर यांनी २९ मे राेजी वाशी पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून मारहाण करणाऱ्या बारा जणांविरूद्ध भादंसंचे कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास वाशी ठाण्याचे पाेलीस करीत आहेत.