माकणी काेविड सेंटरला दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:37+5:302021-05-09T04:33:37+5:30
उमरगा: माकणी येथील बी.एस.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात काेराेना बाधित रुग्णांसाठी ...
उमरगा: माकणी येथील बी.एस.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात काेराेना बाधित रुग्णांसाठी आयसाेलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या केंद्राची राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदर यांनी पाहणी केली. याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्याशी करण्यात येत असलेल्या उपाययाेजनांचा आढावा घेतला.
औषधांचा पुरवठा, तपासणी, जेवण, स्वच्छता आदी बाबींचीही त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, आयसाेलेशन सेंटरमध्ये गावातील रुग्ण माेठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पाेलीस कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणीही केली. यानंतर प्रा. बिराजदार यांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांच्याशी चर्चा केली व पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यास सांगितले. यावेळी किशोर साठे, सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, ग्रामपंचायत सदस्य सरदार मुजावर, अभिमन्यू कुसळकर, शिवाजी साठे, गोविंद चव्हाण, गोविंद साठे, विकास भोरे, वैद्यकीय अधिकारी संतोष मनाळे, गोपाळ ढोणे, बाळू कांबळे, सुभाष आळंगे आदींची उपस्थिती हाेती.