ॲग्राे कंपनीचे गाेदाम फाेडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:31 AM2021-05-17T04:31:35+5:302021-05-17T04:31:35+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील वरूडा राेडवरील उपळा (मा.) येथील ओडीएफसी ॲग्राे कंपनीचे गाेदाम फाेडून अज्ञाताने साेयाबीनच्या ५० बॅग लंपास केल्या. ...
उस्मानाबाद : तालुक्यातील वरूडा राेडवरील उपळा (मा.) येथील ओडीएफसी ॲग्राे कंपनीचे गाेदाम फाेडून अज्ञाताने साेयाबीनच्या ५० बॅग लंपास केल्या. ही घटना १३ ते १४ मे या कालावधीत घडली. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील साराेळा येथील अमाेल शहाजीराव रणदिवे यांची उपळा (मा.) येथे ओडीएफसी ॲग्राे कंपनी आहे. या कंपनीच्या गाेदामात त्यांनी साेयाबीन ठेवले हाेते. हे गाेदाम बंद असल्याची संधी साधत, अज्ञात व्यक्तीने १३ ते १४ मे या कालावधीत गाेदामाचे शटर उचकटून आत प्रवेश मिळविला. यानंतर, आतील साेयाबीनच्या २५ किलाे वजनाच्या ५० बॅग अज्ञाताने लंपास केल्या. ज्याची किंमत ६५ हजार रुपये एवढी आहे. दरम्यान, चाेरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर अमाेल रणदिवे यांनी उस्मानाबाद ग्रामीण पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून १५ मे राेजी अज्ञाताविरुद्ध भादंसंचे कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास ग्रामीण पाेलीस करीत आहेत.