नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:57+5:302021-07-14T04:37:57+5:30

उस्मानाबाद : तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. शिवाय, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस ...

Warning to riverside villages | नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

उस्मानाबाद : तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. शिवाय, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढ्यालगतच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

उस्मानाबाद तहसीलदार गणेश माळी यांनी तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, पोलीसपाटील यांना पत्र काढून याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढ्यालगत असलेल्या गावांमध्ये दक्षता घेणे गरजेचे आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिमुसळधार पाऊस झाल्यास अशा गावांतील लोकांनी उंच टेकडीवर जाऊन सुरक्षित ठिकाणी थांबावे. ज्या ठिकाणी अरुंद धोकादायक पूल, बंधारा, जास्त पाणी प्रवाह आहे, त्या ठिकाणी नागरिकांना जाऊ देऊ नये, गावात दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, महिला तलाठ्यांनी विशेष लक्ष ठेवून गावातील परिस्थितीची माहिती घ्यावी, अशा सूचना तहसीलदार गणेश माळी यांनी उस्मानाबाद तालुक्यातील नदी, नाले, ओढे काठावरील गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलीसपाटील यांना दिल्या आहेत.

Web Title: Warning to riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.