लुटारूंना विरोध केल्याने वॉचमनचा गोळी घालून खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 07:41 PM2021-06-08T19:41:07+5:302021-06-08T19:41:49+5:30

Crime News कळंब येथील मार्केट यार्ड भागातील अजय साहेबराव जाधव यांच्या अडत दुकानात खुनाची घटना शनिवारी पहाटे घडली होती.

Watchman shot and killed for resisting robbers | लुटारूंना विरोध केल्याने वॉचमनचा गोळी घालून खून 

लुटारूंना विरोध केल्याने वॉचमनचा गोळी घालून खून 

googlenewsNext

उस्मानाबाद : अंमली पदार्थांचे सेवन करुन लुटीच्या उद्देशाने शिरलेल्या आरोपींना विराेध केल्यानेच त्यांनी कळंब येथील वॉचमनचा गोळी घालून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. अवघ्या चोवीस तासात गजाआड केल्यानंतर आरोपींनी कोठडीत गुन्ह्याची कबुली देताना खुनाचा उद्देश सांगितला. 

कळंब येथील मार्केट यार्ड भागातील अजय साहेबराव जाधव यांच्या अडत दुकानात खुनाची घटना शनिवारी पहाटे घडली होती. येथे वॉचमन म्हणून कार्यरत असलेले मच्छिंद्र छगन माने हे शनिवारी पहाटे पहारा देत असताना त्यांच्याशी झटापट करुन छातीत गोळी झाडून त्यांचा खून झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या पथकाने चोवीस तासांच्या आत याप्रकरणातील आरोपींचा छडा लावला. त्यांनी आरोपी शाम उर्फ बाॅयलर राजाभाऊ पवार (रा.केज, जि.बीड) व गणेश सुब्राव पवार (रा.कल्पनानगर, कळंब) या दोन आरोपींना रविवारी गजाआड केले. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दुकानातील रोकड लुटण्याच्या उद्देशानेच त्यांनी हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.

आरोपींनी केली होती पार्टी...
गुन्हा घडवून आणण्यापूर्वी आरोपींनी मार्केट यार्डालगतच पार्टी केली होती. त्यात मद्य व गांजाचे सेवन करण्यात आले होते. एकूण ११ जणांनी हा लुटीचा प्लॅन आखला होता. यातील काही जण हे यार्डातच हमाली काम करीत होते. त्यांनी दुकानात शिरुन रोकड लुटण्याचा बेत इतरांना सांगितला. यातील एकाकडे गावठी बंदूक होती. हे सर्वजण कंपाऊंडमधून आत शिरल्यानंतर वॉचमन माने यांनी त्यांना हटकले होते. यातून आरोपी व माने यांची झटापट झाली. यातच बंदूकधारी आरोपीने गोळी झाडली. घटनेनंतर हे सर्व जण तेथून पसार झाले. पोलीस गोळी झाडणाऱ्यांसह ९ आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Watchman shot and killed for resisting robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.