अवकाळी पावसाचा तडाखा! तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणीच पाणी
By चेतनकुमार धनुरे | Updated: April 20, 2024 18:45 IST2024-04-20T18:23:10+5:302024-04-20T18:45:05+5:30
धाराशिव जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

अवकाळी पावसाचा तडाखा! तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणीच पाणी
तुळजापूर (जि. धाराशिव) : धाराशिव जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी लागली. तुळजापुरात झालेल्या धो-धो पावसामुळे बाहेरील पाणी मंदिराच्या परिसरात शिरले होते.
तुळजाभवानी मंदिरात पाणीच पाणी, धो-धो पावसामुळे बाहेरील पाणी मंदिराच्या परिसरात शिरले #rain#tulajapurpic.twitter.com/mO8Avc8w9b
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) April 20, 2024
धाराशिव जिल्ह्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. उमरगा तालुक्यातील मुरुम येथे वीज पडल्यामुळे सात शेळ्या ठार झाल्या तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच याच तालुक्यातील तलमोड, तुरोरी, तुगाव येथे वीज पडून तीन पशुधन दगावले आहे. दरम्यान, तुळजापुरात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरचे पाणी मंदिर परिसरात शिरले. पाण्याच्या प्रवाहाचा वेग मोठा होता. यामुळे चेंबर्स उघडताना स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. तोपर्यंत होमशाळेजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.