‘मांजरा’तील जलसाठा १०३ दलघमीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:37 AM2021-09-06T04:37:13+5:302021-09-06T04:37:13+5:30

तालुक्यातील येरमाळा वगळता इतर महसूल मंडळात यंदा वरुणराजा तोलूनमापूनच बरसत असल्याचे चित्र आहे. मागच्या तीन महिन्यात अशीच स्थिती असून ...

Water storage in 'Manjara' at 103 Dalghami | ‘मांजरा’तील जलसाठा १०३ दलघमीवर

‘मांजरा’तील जलसाठा १०३ दलघमीवर

googlenewsNext

तालुक्यातील येरमाळा वगळता इतर महसूल मंडळात यंदा वरुणराजा तोलूनमापूनच बरसत असल्याचे चित्र आहे. मागच्या तीन महिन्यात अशीच स्थिती असून थुईथुई पडणाऱ्या पावसामुळे पर्जन्यमानाचा आलेख समाधानकारक दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र १२ पैकी ८ जलसाठवण स्त्रोतांना पावसाची गरज आहे.

चौकट...

शनिवारी २७ मि.मी. पाऊस...

शनिवारी तालुक्यातील येरमाळा मंडळात सर्वाधिक ४१ मि.मी. पावसाची नोंद झाली तर कळंब २५.५, इटकूर व मोहा प्रत्येकी २४, शिराढोण १९ व गोविंदपूर २६ याप्रकारे एकूण २७ मि.मी. पाऊस झाला आहे.

जलसाठ्यात पडतेय भर...

लातूर, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांसाठी मदतगार ठरणारा मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा मागच्या दोन महिन्यात ७५ ते ८५ दलघमीच्या दरम्यान रेंगाळात होता. मागच्या चार दिवसात पाणलोट क्षेत्राच्या वरच्या भागात बरा पाऊस झाल्याने शनिवारी प्रथमच एका दिवसात ५.५ दलघमी एवढा येवा नोंदला गेला असून यामुळे २२४.०९३ दलघमी क्षमतेच्या प्रकल्पातील पाणीसाठा १०३ दलघमीवर पोहचला आहे.

दृष्टिक्षेपात पाऊस

मंडळ पाऊस

कळंब २५.५

इटकूर २४

येरमाळा ४१.८

मोहा २४

शिराढोन १९

गोविंदपूर २६

Web Title: Water storage in 'Manjara' at 103 Dalghami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.