स्वातंत्र सैनिकांच्या मराठवाडा विकासाचा ध्यास पुर्ण करण्यासाठी आपण काम करूया- तानाजी सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2023 01:50 PM2023-09-17T13:50:54+5:302023-09-17T13:51:17+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृत्तीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन ध्वजारोहण, धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. 

We will work to fulfill the ambition of Marathwada freedom fighters in the Marathwada liberation struggle - Tanaji Sawant | स्वातंत्र सैनिकांच्या मराठवाडा विकासाचा ध्यास पुर्ण करण्यासाठी आपण काम करूया- तानाजी सावंत

स्वातंत्र सैनिकांच्या मराठवाडा विकासाचा ध्यास पुर्ण करण्यासाठी आपण काम करूया- तानाजी सावंत

googlenewsNext

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७५व्या अमृत महोत्सव मोठ्या उत्सहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृत्तीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन ध्वजारोहण, धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना मंत्री तानाजी सावंत यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी मुक्तीसोबत मराठवाडा विकासाचे पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण काम करू असे म्हटले. या सोहळ्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचे, बक्षिस वितरण,  व स्वातंत्रय सैनिक यांचे वारसदार यांना ओळखपत्र व नेमप्लेट वाटप करण्यात आले. उपस्थित, सर्व मान्यवर, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व वारसदार यांचे  डॉ. सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी धाराशिव यांनी आभार व्यक्त केले. 

सदर कार्यक्रमात जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील,  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा न्यायाधीश शेंडे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद  राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, प्रतिष्ठित व्यक्ती, स्वातंत्रय सैनिक व त्यांचे वारसदार, शहिद जवानांच्या पत्नी व आई वडील आणि नागरिक उपस्थित होते.

Web Title: We will work to fulfill the ambition of Marathwada freedom fighters in the Marathwada liberation struggle - Tanaji Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.