बाळूमामांच्या बागाचे गोंधळवाडीत जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:23 AM2020-12-27T04:23:59+5:302020-12-27T04:23:59+5:30
बाळूमामांच्या बागाचे गोंधळवाडीत जंगी स्वागत तामलवाडी - काेल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर येथील श्री बाळूमामा देवालयाच्या बागा(नं.११) तसेच पालखीचे तुळजापूर तालुक्यातील ...
बाळूमामांच्या बागाचे गोंधळवाडीत जंगी स्वागत
तामलवाडी - काेल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर येथील श्री बाळूमामा देवालयाच्या बागा(नं.११) तसेच पालखीचे तुळजापूर तालुक्यातील गाेंधळवाडी गावात आगमण हाेताच जाेरदार स्वागत करण्यात आले. मुक्कामानंतर बागा व पालखीस निराेप देण्यात आला.
बाळूमामा मंदिरापासून बागा १५ वर्षे महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये प्रत्येक गावोगावी फिरतो. तेथून निघाल्यापासून बागा (नं. ११) हा मंदिराकडे कधी परत गेलेला नाही. या बागामध्ये ४ हजार शेळ्या-मेंढ्या पिल्ले असून, बाळूमामा यांचा एक घोडा, सहा कळप मेंढ्या आहेत. ही पालखी सोमवारी गोंधळवाडी गावामध्ये मोहन लक्ष्मण मोठे यांच्या शेतामध्ये दाखल झाली असता पाच दिवस मुक्कामी हाेती. या काळात सकाळी तसेच संध्याकाळी ८ वाजता वाजता आरती होते. यानंतर महाप्रसाद वाटप केले जात असे. महाप्रसादानंतर धनगरी ओवी, भारूड व अन्य पारंपारिक कार्यक्रम हाेत हाेते. यासाठी आप्पा यमगर, रमेश मोठे, अनिल कोळेकर, सौरभ शिरगिरे, संजय शिरगिरे, महाविर मोठे, हनुमंत मोठे, युवराज माने, धनाजी रेड्डी, श्रीराम माने आदींनी पुढाकार घेतला.
फाेटाे ओळी...
प्रस्थानापूर्वी पालखीची सुहासिनी महिलांनी नारळ कलश ठेऊन पूजा केली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, बेल, भंडारा, खोबऱ्याची पालखीवर उधळण केली.