विघ्नहर्त्याचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:33 AM2021-09-11T04:33:11+5:302021-09-11T04:33:11+5:30

उस्मानाबाद : जिल्हाभरात शुक्रवारी विघ्नहर्त्या गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गणेशाच्या आगमनासाठी घराघरात मागील दोन दिवसांपासून आरास बनविण्यासह ...

Welcome to Vighnaharta district! | विघ्नहर्त्याचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत !

विघ्नहर्त्याचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत !

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्हाभरात शुक्रवारी विघ्नहर्त्या गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गणेशाच्या आगमनासाठी घराघरात मागील दोन दिवसांपासून आरास बनविण्यासह इतर तयारी सुरू होती. शुक्रवारी सकाळपासनूच बाजारात गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. चिमुकले आपल्या पालकांसह नटूनथटून गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात आले होते. ‘गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या गजरात मूर्तीची उत्साहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक उत्सवांना नियम व अटी घालून परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे या मंडळांच्या वतीनेही अगदी साधेपणाने हा उत्सव साजरा केला जात आहे. सलग दुसऱ्या वर्षीही ढोल ताश्यांच्या तालाला मात्र फाटा देण्यात आला.

परंड्यातील गर्दी आवाक्याबाहेर

परंडा : शुक्रवारी सकाळच्या सत्रात घरगुती गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी येथील आठवडी बाजार परिसरात मोठी झुंबड उडाली होती. पुजेचे साहित्य आणि गणेशमूर्तीसह मोरयाचा गजर दिसून येत होता. शहरातील आठवडा बाजाराच्या प्रांगणात गणपती मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या होत्या. येथे सकाळच्यावेळी गणेश मूर्तीच्या खरेदीसाठी एवढी गर्दी होती की, गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तसेच या परिसरात दुचाकी पार्किंगमुळे देखील वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले.

घरगुती पूजन व गणेश प्रतिष्ठापनेसाठी सकाळी ११.०३ ते दुपारी १.३३ पर्यंत मुहूर्त असल्याने सकाळपासून नागरिक गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारात आले होते. पूजेसाठी लागणारे साहित्य व सजावटीच्या सामान घेण्यासाठीही मोठी गर्दी होती. वेगवेगळय़ा आकारांतील आकर्षक मूर्ती घरी नेण्यासाठी बच्चेकंपनीही आग्रही होती. या वर्षी मूर्तीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. गणपतीसमोर आरास करण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध होते.

चौकट...

तगडा बंदोबस्त

पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक ३, पोलीस कर्मचारी ५० तर ३० होमगार्डचा ताफा पोलिस प्रशासनाच्या दमतीला असणार आहे. ग्रामीण पातळीवर पोलीस पाटील गणेश मंडळांवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस पाटलांवर दररोज रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांनी सोपविली आहे.

100921\psx_20210910_151648.jpg

गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी आठवडी बाजार परिसरात  झुंबड उडाली होती.

Web Title: Welcome to Vighnaharta district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.