गावाकडून दगड फोडीच्या कामावर परताना कारने उडवले, दुचाकीवरील काका-पुतण्याचा मृत्यू

By चेतनकुमार धनुरे | Published: June 26, 2023 05:09 PM2023-06-26T17:09:06+5:302023-06-26T17:09:23+5:30

खामगाव-शेगाव राष्ट्रीय महामार्गावरील आंदोरा गावालगत झाला अपघात

While returning from the village to the work of stone breaking, the car blew up, the death of uncle-nephew on a two-wheeler | गावाकडून दगड फोडीच्या कामावर परताना कारने उडवले, दुचाकीवरील काका-पुतण्याचा मृत्यू

गावाकडून दगड फोडीच्या कामावर परताना कारने उडवले, दुचाकीवरील काका-पुतण्याचा मृत्यू

googlenewsNext

कळंब (जि.धाराशिव) : गावाकडील नातेवाईकांचे लग्नकार्य, देवकार्य उरकून बार्शी येथे दगड फोडणीच्या कामावर जात असलेल्या काका-पुतण्याचा खामगाव शेगाव पालखी मार्गावरील आंदोरा गावालगत कारने उडवल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

नांदेड जिल्ह्यातील लोहा व अर्धापूर तालुक्यातील काही कुंटूब बार्शी (जि. सोलापूर) येथे दगड फोडणीचे काम करतात. हे कुंटूब नातेवाईकांच्या लग्न, देवकार्यासाठी गावाकडे गेले होते. यानंतर रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते गावाकडून बार्शीकडे मार्गस्थ झाले. यापैकी माधव पुर्बा दासे (२७, रा. कामटा बु. ता. अर्धापूर जि. नांदेड) व शिनू उत्तम दासे (१६, रा. कापसी (कु) ता. लोहा जि. नांदेड) हे काका-पुतणे त्यांच्याकडील दुचाकीवरून कळंबमार्गे जात होते. 

यावेळी खामगाव-शेगाव राष्ट्रीय महामार्गावरील आंदोरा गावालगत त्यांच्या दुचाकीला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कारने ठोकरले. यात दुचाकीवरील शिनू दासे यांचा जागीच तर माधव दासे यांचा धाराशिव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताचे कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सोमवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.

Web Title: While returning from the village to the work of stone breaking, the car blew up, the death of uncle-nephew on a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.