ट्रिपल सीट चालकांना आवरणार कोण? ट्रिपल सीट वाहनचालकांना आवरणार कोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:28+5:302021-09-07T04:39:28+5:30

उस्मानाबाद शहरात ग्रामीण भागातून अनेकजण व्यवसाय, रोजगारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. गावातून येतेवेळी एका दुचाकीवरील ट्रिपल सीटचे प्रमाण अधिक ...

Who will cover the triple seat drivers? Who will cover the triple seat drivers | ट्रिपल सीट चालकांना आवरणार कोण? ट्रिपल सीट वाहनचालकांना आवरणार कोण

ट्रिपल सीट चालकांना आवरणार कोण? ट्रिपल सीट वाहनचालकांना आवरणार कोण

googlenewsNext

उस्मानाबाद शहरात ग्रामीण भागातून अनेकजण व्यवसाय, रोजगारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. गावातून येतेवेळी एका दुचाकीवरील ट्रिपल सीटचे प्रमाण अधिक दिसून येते. तसेच शहरातही अनेक तरुण, तरुणी ट्रिपल सीट दुचाकी दामटीत असल्याचे आढळून येते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजमाता जिजाऊ चौक, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, नेहरू चौक या परिसरात अनेक दुचाकीस्वार ट्रिपल सीट प्रवास करीत असतात. या भागात वाहतूक शाखेच्यावतीने कारवाईची माेहीम राबविण्यात येते.

वाहन चालकांना वाहतूक नियमांची शिस्त लागावी यासाठी शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई केली जात आहे. मागील आठ महिन्यांच्या कालावधीत २ हजार ३८३ दुचाकीस्वारांवर कारवाई करून ४ लाख ७६ हजार हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. असे असतानाही वाहनचालकांना नियमांचे पालन केले जात नाही.

दुचाकीचालकांनो हे नियम पाळा

वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा.

दारु पिऊन वाहन चालवू नका.

विना हेल्मेट वाहन चालवू नका.

विरुद्ध दिशेने वाहन चालवू नका.

वेगाने वाहन चालवू नका.

धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करू नका.

तर पाचशे रुपयांचा दंड

ट्रिपल सीट २०० रुपये दंड

विरुद्ध दिशेने वाहन चालविणे २०० रुपये दंड

मोबाईलवर बोलत वाहन चालविणे २०० रुपये दंड

विना हेल्मेट प्रवास २०० रुपये दंड

वाहन परवाना नसणे ५०० रुपये दंड

परवाना सोबत न बाळगणे २०० रुपये दंड

कोट...

दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यास २०० रुपये दंड करण्यात येत आहे. दुसऱ्या वेळेस नियमाचे उल्लंघन केल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येतो. त्याचबरोबर वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येतो. कारवाईची मोहीम सुरूच आहे.

इक्बाल सय्यद, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

Web Title: Who will cover the triple seat drivers? Who will cover the triple seat drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.