ग्रामीण युवकांना अभिनय प्रशिक्षण देणार : तडवळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:38 AM2021-02-17T04:38:57+5:302021-02-17T04:38:57+5:30
कळंब : ग्रामीण भागातील युवकांनी अभिनयाच्या प्रशिक्षणातून चित्रपट क्षेत्रात करिअर करावे, यासाठी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून चांगले कलाकार ...
कळंब : ग्रामीण भागातील युवकांनी अभिनयाच्या प्रशिक्षणातून चित्रपट क्षेत्रात करिअर करावे, यासाठी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून चांगले कलाकार तयार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत सिनेअभिनेते सोमनाथ तडवळकर यांनी व्यक्त केले.
कळंब येथे अशोक चोंदे मित्रमंडळाच्या वतीने तडवळकर यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अशोक चोंदे होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी आपले मित्र ग्रुप, शिवदत्त मॉर्निंग योगा ग्रुप, दोस्ती ग्रुपच्या सदस्यांनी सिनेअभिनेते सोमनाथ तडवळकर यांचे स्वागत केले. यावेळी ज्ञानोबा वळेकर, ऋषिकेश चोंदे, नगरसेवक सतीश टोणगे, प्रा. संजय घुले, डॉ. बाळकृष्ण भवर, अमर चाऊस, अतुल गायकवाड, नेताजी देशमुख, डॉ. रूपेश कवडे, बबन पांचाळ, विठ्ठल जाधव, सुनील हुलसुलकर, रविंद्र ताड, प्रशांत दशवंत, बालाजी पांचाळ, अभिमन्यू तांबडे, डॉ. शिवाजीराव गोरे, डॉ. अभिमन्यू मेटे, अरूण काळे, ईश्वर राठोड, श्रीनिवास चोंदे, नारायण बाकले, जब्बार बागवान, दत्ता अरडकर, प्रकाश गिरी, ऐहान बागवान आदी उपस्थित होते.