तुळजापूर बसस्थानकातून महिलेचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:48 AM2021-02-23T04:48:50+5:302021-02-23T04:48:50+5:30

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा येथील सखूबाई दयानंद वाघमारे या १७ फेब्रुवारी राेजी तुळजापूर ...

Women's jewelery lamps from Tuljapur bus stand | तुळजापूर बसस्थानकातून महिलेचे दागिने लंपास

तुळजापूर बसस्थानकातून महिलेचे दागिने लंपास

googlenewsNext

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा येथील सखूबाई दयानंद वाघमारे या १७ फेब्रुवारी राेजी तुळजापूर बसस्थानकातील बसमध्ये चढत असताना त्यांच्या कापडी पिशवीतील २४ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने असलेली पर्स लंपास केली. घरी गेल्यानंतर आपलेे दागिने चाेरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी २० फेब्रुवारी राेजी तुळजापूर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

चाैकट....

पाणबुडी माेटार लंपास

तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी (काटी) शिवारातील विहिरीतून ५ अश्वशक्ती क्षमतेचा विद्युतपंप अज्ञाताने लंपास केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर शंकर माळी यांनी तामलवाडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Women's jewelery lamps from Tuljapur bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.