सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची सहा महिन्याच्या मुलासह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 19:00 IST2019-05-08T18:58:27+5:302019-05-08T19:00:00+5:30
पैैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे अनेकवेळा पूजाला उपाशीपोटीही ठेवले.

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची सहा महिन्याच्या मुलासह आत्महत्या
उस्मानाबाद : सासरच्या मंडळीच्या छळास कंटाळून एका विवाहितेने सहा महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना उमरगा तालुक्यातील माडज येथे मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, माडज येथील लक्ष्मण काळे, सासू व तीन ननंद असे पाचजण मिळून विवाहिता पूजा लक्ष्मण काळे हिचा पैशासाठी छळ करीत होते. पैैशाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे अनेकवेळा पूजाला उपाशीपोटीही ठेवले. सततच्या या छळास कंटाळून विवाहिता पूजा हिने सहा महिन्याचा मुलगा कृष्णा लक्ष्मण काळे याच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
ही घटना मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मिरा अमृत घोगरे (रा. टाकळगाव, ता. अहमदपूर) यांच्या फिर्यादीवरून सासरच्या पाचजणांविरूद्ध भादंविचे कलम ४९८ (अ), ३०६, ३४ प्रमाणे बुधवारी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.