भारत माता मंदिर प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद : आवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:35 AM2021-08-22T04:35:25+5:302021-08-22T04:35:25+5:30

शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती संचलित भारतमाता मंदिर प्रकल्पास शुक्रवारी आवले भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्या बोलत ...

The work of Bharat Mata Mandir project is commendable | भारत माता मंदिर प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद : आवले

भारत माता मंदिर प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद : आवले

googlenewsNext

शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती संचलित भारतमाता मंदिर प्रकल्पास शुक्रवारी आवले भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, मुख्याधिकारी गजानन शिंदे, जगदीश सोंडगे, जिल्हा कार्यवाह कृष्णा मसलेकर, शंकर जाधव, कल्याण जोशी, राजेश परदेशी, संतोष गवळी, शहाजी जाधव, श्रीनिवास माळी, व्यंकटेश पोतदार, विरेश स्वामी आदी उपस्थित होते. याप्रसंगी भारत मातेच्या मूर्तीचे पूजन करून अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांचे भारतमातेची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रकल्पाचे पूर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव यांनी प्रकल्पाची माहीती दिली. आवले म्हणाल्या, भूकंपसारख्या भीषण नैसर्गिक आपत्तीमधून लोकांना बाहेर काढून त्यांचे मनोबल वाढविण्यामध्ये या प्रकल्पाचा सिंहाचा वाटा आहे. या प्रकल्पास भविष्यातही प्रशासनाचे सहकार्य लाभेल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The work of Bharat Mata Mandir project is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.