कोरोना काळातील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:38 AM2021-09-14T04:38:48+5:302021-09-14T04:38:48+5:30

कळंब : कोरोनाच्या कठीण काळात वाडी वस्तीवरील, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असताना, त्यांच्यापर्यंत विविध माध्यमातून पोहोचत ...

The work of teachers in the Corona period is admirable | कोरोना काळातील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद

कोरोना काळातील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद

googlenewsNext

कळंब : कोरोनाच्या कठीण काळात वाडी वस्तीवरील, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असताना, त्यांच्यापर्यंत विविध माध्यमातून पोहोचत ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. यामुळेच रोटरीच्या पुरस्काराने त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी केले.

कळंब शहर रोटरी क्लब तालुक्यातील उपक्रमशील व आदर्श शिक्षकांचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन गौरव करत असते. यंदा कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देणाऱ्या गुणी शिक्षकांची यासाठी रोटरीने निवड केली आहे. कळंब येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. पवार बोलत होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष धर्मेंद्र शहा, सचिव अरविंद शिंदे , प्रभारी गटशिक्षणाधकारी मधुकर तोडकर, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर लिटरशी संजय घुले यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी रोटरीचे डॉ. अभिजित जाधवर, वैजेनाथ पकवे, डॉ. सुयोग काकांनी, अमोल लोढा, गणेश डोंगरे, व्ही. के. गायकवाड, डॉ. रुपेश कवडे, पंडित दशरथ, हर्षद अंबुरे, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. सचिन पवार, विश्वजित ठोंबरे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुशील तिर्थकर यांनी केले तर आभार अरविंद शिंदे यांनी मानले.

चौकट...

यांचा झाला गौरव...

यावेळी रोटरीचा नेशन्स बिल्डर अवॉर्ड देऊन ईटकूर जि. प. प्रशालेचे सहशिक्षक अनिल क्षीरसागर, मस्सा येथील अब्दुल काझी यांच्यासह सचिन भांडे, स्मिता कुलकर्णी, विशाल संगवे, अश्रूबा कोठावळे या सहा शिक्षकांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र , शाल पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Web Title: The work of teachers in the Corona period is admirable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.