आंदाेलनात ‘तेरणा’च्या कामगारांची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:28 AM2021-02-15T04:28:38+5:302021-02-15T04:28:38+5:30
ढाेकी -मागील तेरा वर्षांपासून बंद असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी, सभासदांच्या ...
ढाेकी -मागील तेरा वर्षांपासून बंद असलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी, सभासदांच्या वतीने २२ फेब्रुवारीपासून साखळी उपाेषण करण्यात येणार आहे. या आंदाेलनात आता कामगारांनीही उडी घेतली आहे. रविवारी कारखान्याच्या गेटवर बैठक घेऊन कामगारांनी ही घाेषणा केली.
उस्मानाबाद तालुक्यातील ढाेकी येथील तेरणा साखर कारखाना हा सहकारी क्षेत्रातील मराठवाड्यातील पहिला कारखाना आहे. हा कारखाना मागील तेरा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांसह सभासदांचे माेठे नुकसान हाेत आहे. दरम्यान, तेरणा कारखाना सुरू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी २२ फेब्रुवारीपासून शेतकरी, सभासदांच्या पुढकारातून आकारास आलेल्या तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने साखळी उपाेषण सुरू करण्यात येणार आहे. या आंदाेलनात आता कारखाना कामगारांनीही उडी घेतली आहे. १४ फेब्रुवारी राेजी कारखान्याच्या गेटवर बैठक घेऊन ही घाेषणा केली. सभासदांना जाेपर्यंत कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने लेखी हमी मिळत नाही, ताेवर आम्हीही शेतकरी, सभासदांना साथ देणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीस दीडशेवर शेतकरी उपस्थित हाेते.