चिंताजनक ! मुंबईहून परतलेल्या चालकासोबत उस्मानाबादेत कोरोनाचा पुनर्प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 06:41 PM2020-05-11T18:41:15+5:302020-05-11T18:42:18+5:30

चालक सोलापूर जिल्ह्यातील माढा भागातून टरबूज घेऊन ते विक्रीसाठी नवी मुंबई व पुण्याला गेला होता़ 

Worrying! Corona re-enters in Osmanabad, 20-year-old driver positive | चिंताजनक ! मुंबईहून परतलेल्या चालकासोबत उस्मानाबादेत कोरोनाचा पुनर्प्रवेश

चिंताजनक ! मुंबईहून परतलेल्या चालकासोबत उस्मानाबादेत कोरोनाचा पुनर्प्रवेश

googlenewsNext
ठळक मुद्देइतर ८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

उस्मानाबाद : जिल्ह्यातील तीन कोरोना बाधित पूर्णपणे बरे होऊन जिल्हा कोरोनामुक्त झालेला असतानाच आता सोमवारी कोरोनाचा पुनर्प्रवेश झाला आहे़ परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील २० वर्षीय युवकास कोरोनाची बाधा झाल्याचे सोमवारी आलेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले

बाधित युवक चालक असून, त्याच्या मालवाहू वाहनाद्वारे सोलापूर जिल्ह्यातील माढा भागातून टरबूज घेऊन ते विक्रीसाठी नवी मुंबई व पुण्याला गेला होता़ परतल्यानंतर रविवारी बरे वाटत नसल्याने तो परंडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता़ त्याच्यात कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्याने स्वॅब घेऊन तपासणीसाठी लातूरला पाठविण्यात आले होते़ सोमवारी सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ इतर ८ रुग्णांचे अहवाल मात्र, निगेटीव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़राज गलांडे यांनी सांगितले़

Web Title: Worrying! Corona re-enters in Osmanabad, 20-year-old driver positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.