भगवती देवीजींची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:27 AM2021-01-09T04:27:01+5:302021-01-09T04:27:01+5:30
घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आराेग्य धाेक्यात तुळजापूर-शहरातील चंद्रकुंड परिसरात माेठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागात वास्तव्य करणाऱ्या ...
घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आराेग्य धाेक्यात
तुळजापूर-शहरातील चंद्रकुंड परिसरात माेठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागात वास्तव्य करणाऱ्या लाेकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने तातडीने स्वच्छता माेहीम राबवावी, अशी मागणी रहिवाशांतून हाेत आहे.
परंडा येथे तूर खरेदी केंद्र सुरू
परंडा- सरकारच्या आधारभूत धान्य खरेदी याेनजेच्या माध्यमातून परंडा येथे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी श्री साईकृपा कृषीपूरक व्यवसाय सेवा सहकारी संस्थेच्या वतीने ऑनलाइन नाेंदणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने नाेंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांची ऑनलाइन नाेंदणी सुरू
ईट- भूम तालुक्यातील ईट येथे तूर हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. हे केंद्र तनुजा महिला शेतीपूरक सेवा पुरवठा सहकारी संस्थेला मिळाले आहे. या संस्थेच्या वतीने ऑनलाइन नाेंदणी सुरू करण्यात आली आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांनी मुदतीत नाेंदणी करून घ्यावी, असे आवाहन उमेश जनार्दन साेन्ने, दिनेश सुब्राव शिंदे यांनी केले आहे.
२४३ विद्यार्थ्यांचा सामान्यज्ञान स्पर्धेत सहभाग
तुळजापूर- तालुक्यातील किलज येथील अक्षर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे २४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदविला. सहभागी स्पर्धकांना मेलद्वारे प्रमाणपत्रे देण्यात आली, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष डाॅ. अशाेक मर्डे यांनी दिली. स्पर्धेचे संयाेजन ग्रंथपाल नारायण सागर यांनी केले.
जिल्हा उपाध्यक्षपदी बरूरकर यांची वर्णी
तुळजापूर- महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ महिला जिल्हा उपाध्यक्षपदी येथील नगरपालिकेतील आस्थापना विभागाच्या प्रमुख प्रफुल्लता बरूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. बरूरकर यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत हाेत आहे.
सेवानिवृत्तीनिमित्त इंदापूरकर यांचा सत्कार
उमरगा- शहरातील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी इंदापूरकर व नयना इंदापूरकर यांनी प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर मंगळवारी सेवानिवृत्त झाले. याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डाॅ. चंद्रकांत महाजन, मल्लिकार्जुन दंडगे, प्रा. शिवाजी वडणे, डाॅ. कपिल महाजन, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, सुभाष चव्हाण आदींची उपस्थिती हाेती.