हळदीच्या कार्यक्रमाने काळ भैरवनाथांच्या यात्रौत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:35 AM2021-04-23T04:35:32+5:302021-04-23T04:35:32+5:30
कोरोनामुळे ३० एप्रिल पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले असले तरी मे महिन्यात होणारे सर्व कार्यक्रम साधेपणाने होणार आहेत. २८ ...
कोरोनामुळे ३० एप्रिल पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले असले तरी मे महिन्यात होणारे सर्व कार्यक्रम साधेपणाने होणार आहेत. २८ एप्रिल पासून भैरवनाथांचे उपवास सुरू होत आहेत. ३ मे रोजी कुलधर्म कुलाचार करुन उपवास सोडले जाणार आहेत. ७ मे रोजी भैरवनाथ यात्रा यावर्षी सुरू होणार आहे. ८ मे रोजी महानैवेद्य व नवस पूर्ण करण्याचा दिवस असून, यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भैरवनाथांचा लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा रथोत्सव यंदा ९ मे रोजी त्रयोदशीस आहे. मात्र कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. फक्त विश्वस्त मंडळ व पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी केले जाणार आहेत. भैरवनाथ भक्तांनी आपापल्या घरी राहून धार्मिक कार्यक्रम साजरा करावा, असे आवाहन मुख्य पुजारी संजय पुजारी यांनी केले आहे.