जिल्हा परिषदेत दिव्यांगांची परवड हाेणार दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:43 AM2021-02-27T04:43:24+5:302021-02-27T04:43:24+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषद येथे येणाऱ्या दिव्यांग अभ्यंगत, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे व मुख्य ...
उस्मानाबाद : जिल्हा परिषद येथे येणाऱ्या दिव्यांग अभ्यंगत, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या संकल्पनेतून ‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमांतर्गत दिव्यांग कक्ष व व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग यांच्या प्रलंबित मागण्यांविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटनेसमवेत बैठक झाली. यामध्ये काही मागण्याही पुढे आल्या हाेत्या. त्याची दखल घेत ‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमाचा एक भाग म्हणून दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग यांच्याकरिता दिव्यांग कक्ष व व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांची पाहणी अध्यक्षा कांबळे तसेच डाॅ. फड यांनी केली. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) डाॅ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) नितीन दाताळ, समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, जिल्हा पशुसंर्धन अधिकारी नामदेव आघाव, जिल्हा जलसंधारण अधिकारी व्ही. जी. जोशी,
शिक्षणाधिकारी (मा.) गजानन सुसर, शिक्षणाधिकारी (प्रा.) अरविंद मोहरे आदींची उपस्थिती हाेती.