जिल्ह्यातील १ लाख २९ हजार केशरी रेशनकार्डधारकांनाही सवलतीत धान्य! शिल्लक धान्यातूनच वाटप : सर्वांनाच धान्य मिळेल याची शाश्वती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:46+5:302021-05-28T04:26:46+5:30
धुळे जिल्ह्यात १ लाख २९ हजार केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब असून शिधापत्रिकेत नाव समाविष्ट असलेल्या प्रत्येक व्यक्तीला १ किलो गहू ...
धुळे जिल्ह्यात १ लाख २९ हजार केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंब असून शिधापत्रिकेत नाव समाविष्ट असलेल्या प्रत्येक व्यक्तीला १ किलो गहू आणि १ किलो तांदूळ स्वस्त दरात मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली. परंतु या कुटुंबांना शिल्लक धान्यातून धान्य वितरीत करावयाचे आहे. जिल्ह्यात १३०९ मेट्रिक टन धान्य शिल्लक असून ज्या तालुक्यात जितके धान्य शिल्लक असेल तितकेच वाटप होईल, असेही त्यांनी सांगितले.
या कुटुंबांसाठीचे गेल्या वर्षींचे शिल्लक धान्य लाभार्थींच्या तुलनेत कमी असल्याने सर्वांनाच धान्य मिळेल याची शाश्वती नाही. प्राधान्याने येणाऱ्यांना धान्य मिळेल. संपल्यानंतर मात्र धान्य मिळणार नाही.
जिल्ह्यात अंत्योदय योजनेची ७६ हजार ९७६ कुटुंब आहेत. त्यापैकी राज्य शासनाने मोफत केलेल्या धान्याचे ८४.४२ टक्के कुटुंबांना वाटप झाले आहे. तर केंद्र शासनाने मोफत केलेल्या धान्याचे २८.१२ टक्के कुटुंबांना वाटप झाले आहे.
जिल्ह्यात प्राधान्य कुुटुंबात समावेश असलेली २ लाख १६ हजार ३३८ कुटंबे आहेत. त्यापैकी राज्य शासनाने मोफत केलेल्या धान्याचे ८४.४२ टक्के कुुटुंबांना वाटप झाले आहे. तर केंद्र शासनाने मोफत केलेल्या धान्याचे २८.१२ टक्के कुुटुंबांना वाटप झाले आहे.
केशरीच्या १ लाख २९ हजार कुुटुंबांना धान्य
धुळे जिल्ह्यात अंत्योदय किंवा प्राधान्य कुुटुंबांच्या यादीत समाविष्ट नसलेल्या १ लाख २९ हजार कुुटुंबांना स्वस्त दरात धान्य मिळणार आहे. हे धान्य केवळ जून महिन्यात मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या धान्यकोट्यामधून शिल्लक असलेल्या धान्यातून या कुुटुंबांना धान्य दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील केशरी कार्डधारकांनादेखील जून महिन्यात स्वस्त दरात धान्य मिळणार आहे. प्रति व्यक्ती १ किलो गहू आणि १ किलो तांदूळ असे धान्य वाटप होईल. शिल्लक असलेल्या धान्यातून केशरी कार्डधारक कुुटुंबांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याच्या सूचना आहेत. तसेच ज्या तालुक्यात जितके धान्य शिल्लक असेल तितकेच धान्य वितरीत होणार आहे. जिल्ह्यात १३०९ मेट्रिक टन धान्य शिल्लक आहे. - रमेश मिसाळ, पुरवठा अधिकारी