धुळ्यात कॅशिअरला मारहाण करीत 1 लाख 80 हजार लुटले
By admin | Published: July 1, 2017 01:03 PM2017-07-01T13:03:53+5:302017-07-01T13:03:53+5:30
एका कंपनीच्या कॅशिअरला तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केली व त्यांच्याकडील रोख 1 लाख 80 हजार रुपये लुटून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली़
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.1 - शहरानजीक अवधान औद्योगिक वसाहतीतील बँक शाखेत भरणा करण्यासाठी जाणा:या एका कंपनीच्या कॅशिअरला तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केली व त्यांच्याकडील रोख 1 लाख 80 हजार रुपये लुटून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी अज्ञात तीन जणांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े भरदिवसा घडलेल्या या जबरी लुटीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आह़े
भिला हिलाल पाटील (रा़ 5 अ पाटकरनगर, नगावबारी चौफुलीजवळ, देवपूर, धुळे) हे अवधान येथील सेवा ऑटोमोटिव्ह प्रा़लि.मध्ये कॅशिअर म्हणून नोकरीला आहेत़ ते शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कंपनीतील पैसे ताडपत्रीच्या बॅगेत ठेवून भरणा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अवधान येथील शाखेत दुचाकीने जात होत़े तेव्हा अग्रसेन इंड्रस्टीजसमोर रस्त्याच्या कडेला उभा एक जिन्स व पिवळा टी-शर्ट घातलेला इसम आपल्याकडे येत असल्याचे पाहून त्याला ठोस लागेन म्हणून पाटील यांनी दुचाकी हळू केली़ त्याचवेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला बाभळाच्या झाडजवळ पांढरा शर्ट घातलेल्या इसमाने जोरात येऊन लाकडी दांडक्याने भिला पाटील यांच्या डोक्यावर वार केला़
मार लागल्याने दुचाकी उभी करीत असताना ते खाली पडल़े तेवढय़ात त्या दोघी इसमासह आणखी एक अनोळखी इसमाने त्यांच्या दुचाकीच्या हॅन्डलला टांगलेली पैशांची बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला़, त्याला भिला पाटील यांनी प्रतिकार केला़ तेव्हा तिघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील पैशांची बॅग जबरीने हिसकावून थोडय़ा अंतरावर उभ्या दुचाकीवर बसून पसार झाल़े बॅगेत रोख 1 लाख 80 हजार रुपये होत़े
याप्रकरणी भिला पाटील यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 25 ते 30 वयोगटातील अज्ञात 3 इसमांविरुद्ध भादंवि कलम 394़ 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास उपनिरीक्षक एस़ ज़े राजपूत करीत आहेत़