सोनगीर ग्रामपंचायतीत १० लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 06:32 PM2019-04-06T18:32:22+5:302019-04-06T18:33:54+5:30

सरपंच, ग्रामसेवकासह पाच जणांवर गुन्हा

10 lakh apes in Sonagir Gram Panchayat | सोनगीर ग्रामपंचायतीत १० लाखांचा अपहार

सोनगीर ग्रामपंचायतीत १० लाखांचा अपहार

Next
ठळक मुद्दे७४४ शोषखड्डे केल्याचे खोटे दाखविले१० लाखांची रक्कम मजुरांच्या खात्यावर केली वर्गचौकशीनंतर गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमत
धुळे : महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ७४४ शोषखड्डे केल्याचे दाखवून ९ लाख ९३ हजार ४०८ रूपये मजुरांच्या नावावर बॅँकेत वितरीत केले. याप्रकरणी सरपंच, तत्कालीन ग्रामसेवकासह पाचजणांविरूद्ध अपहार केल्याचा गुन्हा सोनगीर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.
सोनगीर ग्रामपंचायतीमार्फत २०१६-१७ या वर्षात महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शोषखड्डे करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र कोणत्याही लाभार्थ्याकडे शोषखड्यांचे काम न करता७४४ शोषखड्डे केल्याचे दाखवून खोटे मोजमाप पुस्तक तयार केले. तसेच कामावर असलेल्या मजुरांचे खोटे हजेरी पत्रक तयार करून ९ लाख ९३ हजार ४०८ रूपयाचा निधी मजुरांच्या नावे बॅँकेत खात्यावर वर्ग केला.
हा अपहार २५ मे ते २८ डिसेंबर १८ या कालावधीत झाला. याप्रकरणी धुळे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कपील नवलसिंग वाघ यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून
सरपंच योगीता अविनाश महाजन, तत्कालीन ग्रामसेवक विलास सखाराम सूर्यवंशी, पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे राहूल सैंदाणे, सुशील देवराम मोरे, तत्कालीन ग्रामरोजगार सेवक अरूण माणिक मोरे यांच्याविरूद्ध सोनगीर पोलीस स्टेशनला भादंवि ४०९, ४२०, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर करीत आहेत.

 

Web Title: 10 lakh apes in Sonagir Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.