गाळेधारकांना १०० टक्के सवलतीचे चार दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:22 PM2019-02-24T22:22:13+5:302019-02-24T22:23:29+5:30

महापालिका : गुरूवारी होणार पाहिला टप्पा पूर्ण

100% discount to the stall holders for four days | गाळेधारकांना १०० टक्के सवलतीचे चार दिवस

dhule

Next

धुळे : मालमत्ता कर सवलतीप्रमाणे व्यवसायिकांना देखील करात सवलत मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाकडून अभय योजना लागु करण्यात आली आहे़ त्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीच्या शेवटच्या चार दिवसात गाळेधारकांना या योजनेतून १०० टक्के सवलत दिली जाणार आहे़ त्यामुळे कर भरणाऱ्या व्यावसायिकांची गर्दी वाढू लागली आहे़
शहरातील महापालिकेच्या विविध ठिकाणी दुकाने, गाळे, ओटे, जागा भाडे तत्वावर देण्यात आली आहे़ त्यासाठी महापालिका बाजार विभागाकडून वसुली करण्यात येत असते़ मात्र व्यवसायिकांकडून शंभर टक्के वसुली होत नाही़ म्हणुन अभय योजना लागु केली आहे़ या योजनेतुन एकूण थकबाकी रकमेत सवलत देऊन दरवर्षी मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते़ यावर्षी १२ ते २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत थकबाकीचा व्यवसायिकांनी भरणा केल्यास शास्तीच्या रकमेत १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे़ तर १ ते १८ मार्च या कालावधीत भरणा केल्यास ७५ टक्के सवलत, १९ ते ३० मार्च या कालावधीत भरणा केल्यास ५० टक्के सवलत दिली जाणार आहे़
दोन टप्यातुन मिळणार सवलत
महापालिकेच्या बाजार विभागाने दुकाने, गाळे, ओटे, जागा भाडे थकबाकीदारांसाठी मनपा अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण ८ नियम ५१ अन्वये व नियम ४१ अन्वये शास्ती माफीची रक्कम आयुक्त आपल्या स्वेच्छा निर्णयानुसार माफ करु शकतात, अशी तरतूद आहे. त्यातुन दरवर्षी थकबाकी धारकांना करात सलवतीसाठी निर्णय घेतला जातो़ दरम्यान त्यासाठी तीन टप्प्यात शास्ती माफी अभय योजना लागू केली आहे. त्यातील पहिला टप्पा पुर्ण झाला आहेत़ तर उर्वरित दोन टप्प बाकी आहेत़ दोन टप्यातुन लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे़
शास्तीनंतर आता ठरणार भूमिका
केलेल्या शास्तीमाफी मोहिमेतील ५० टक्के सवलतीचा शुक्रवारी अखेरचा दिवस होता़ असल्याने सायंकाळपर्यत
मालमत्ता कर ४८ लाख १९ हजार रूपये तर धनादेश स्वरूपात १३ लाख ६४ हजार रूपये असे एकूण ६१ लाख ८३ हजार रूपये जमा झाले होते़
मार्च महिन्यात १०० टक्के वसुली करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहे़ तर दुसरीकडे मनपाने शास्ती माफीची मोहिम आधीच जाहीर केली असल्याने नागरिकांना शास्तीवर सवलत देण्यात आली होती़ ही मुदत शुक्रवारी संपुष्टात आली़ शेवटच्या दिवशी सकाळपासूनच नागरिकांनी मनपात रांगा लावून कराचा भरणा केला़ मालमत्ता कराच्या सवलतीचा अंतिम टप्पा असल्याने गुरूवारी मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या़पाणी पट्टी कर २ लाख ४९ हजार रूपये चेक स्वरूपात ७९ हजार अशी एकूण ३ लाख ७८ हजार रूपयांचा भरणा झाला होता़ दरम्यान महापालिका प्रशासनाने मालमत्ता करात सवलत देण्यासाठी शास्तीचा निर्णय ११ रोजी घेतला होता आतापर्यत ६५ लाख ६१ हजार रूपये महापालिका नागरिकांनी मालमत्ता व पाणी पट्टी कर भरला आहे़ सोमवार पासुन कर भरण्यासाठी गर्दी होत आहे़

Web Title: 100% discount to the stall holders for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे